JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / WhatsApp द्वारे कोणी तुमच्यावर नजर ठेवतंय? या 5 सेटिंग्समध्ये लगेच करा बदल

WhatsApp द्वारे कोणी तुमच्यावर नजर ठेवतंय? या 5 सेटिंग्समध्ये लगेच करा बदल

WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. WhatsApp मागील कित्येक महिन्यांपासून आपल्या App मध्ये सतत नवे अपडेट देत आहे. WhatsApp ने नुकतंच अनोळखी लोकांपासून लास्ट सीन हाइड करण्याचा ऑप्शन दिला होता. या फीचरमुळे अनोळखी लोकांपासून तुमच्यावर नजर ठेवली जाणार नाही. जर कोणती तुमच्यावर नजर ठेवत असेल, तर सेटिंगमध्ये बदल करू शकता.

0107

जर कोणती तुमच्यावर नजर ठेवत असेल, तर WhatsApp मध्ये काही सेटिंग्समध्ये बदल करुन सुरक्षित राहू शकता.

जाहिरात
0207

लास्ट सीन - सर्वात आधी Last Seen बंद करू शकता. जर तुम्हाला Last Seen Off करायचं नसेल, तर प्रायव्हसीमध्ये My Contacts करू शकता.

जाहिरात
0307

प्रोफाइल फोटो - तुमचा प्रोफाइल फोटो केवळ कॉन्टॅक्टसाठीच ठेवा. त्यासाठी सेटिंगमध्ये My Contacts सेट करा.

जाहिरात
0407

ग्रुप सेटिंग - WhatsApp ने नुकतंच एक नवं फीचर लाँच केलं आहे. यामुळे तुम्हाला ग्रुपमध्ये कोण Add करू शकतं याचा पर्याय मिळतो. हे फीचर On केल्यामुळे कोणतीही रँडम व्यक्ती तुम्हाला कोणत्याही WhatsApp Group मध्ये Add करू शकत नाही. यासाठी प्रायव्हसीमध्ये My Contacts किंवा एखादा स्पेसिफिक कॉन्टॅक्ट सिलेक्ट करू शकता.

जाहिरात
0507

स्टेटस हाइड - WhatsApp Status देखील तुम्ही सिलेक्टेड युजर्ससाठी ऑन ठेवू शकता. नको असलेल्या कॉन्टॅक्टसाठी स्टेटस हाइड करण्याचा पर्याय WhatsApp मध्ये देण्यात आला आहे.

जाहिरात
0607

WhatsApp Status हाइड करण्यासाठी प्रायव्हसीमध्ये Status पर्यायावर क्लिक करून हवा तो ऑप्शन सिलेक्ट करा.

जाहिरात
0707

WhatsApp About Section देखील हाइड करता येतं. यासाठी सेटिंग मेन्यूमध्ये अकाउंट प्रायव्हसी सेटिंगमध्ये जा. इथे About साठी My Contacts किंवा Nobody ऑप्शन सिलेक्ट करू शकता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या