नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : कोरोना काळापासून ऑनलाईन शॉपिंगमध्ये वाढ झाली आहे. यात पॉप्युलर ई-कॉमर्स साइट Amazon, Flipkart वरुन ग्राहक अगदी विश्वासाने वस्तू खरेदी करतात. पण तरीही या दोन्ही साइट्सवरुन ऑर्डर घरी आल्यानंतर अनेकांची निराशा झाल्याची अनेक प्रकरणं समोर आहेत. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास डळमळीत होतो. एका व्यक्तीसोबत नुकताच असा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांनी Flipkart वर सुरू असलेल्या Big Billion Days सेलमधून iPhone 12 खरेदी केला. पण ज्यावेळी त्यांनी बॉक्स ओपन केला, त्यावेळी आतील वस्तू पाहून ते हादरुन गेले. या व्यक्तीने स्मार्टफोन डिलिव्हरीवेळी फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणं ऐकली होती. त्यामुळे त्यांनी iPhone 12 ऑर्डर करताना फ्लिपकार्ट ओपन बॉक्स डिलिव्हरी पर्याय निवडला आणि हेच त्यांच्यासाठी फायद्याचं ठरलं. ज्यावेळी त्यांनी बॉक्स ओपन केला, त्यावेळी बॉक्समध्ये iPhone ऐवजी निरमा साबण निघाला. हे पाहून सर्वच जण हैराण झाले. त्यानंतर त्यांनी डिलिव्हरी Failed म्हणून सांगितलं. या प्रकारानंतर सर्वात मोठी प्रोसेस सुरू झाली. iPhone ऐवजी साबण आल्यानंतर त्यांनी फ्लिपकार्ट सपोर्टला फोन केला. परंतु कंपनीने वस्तू अजूनही ‘out for delivery’ असल्याचं सांगितलं. यासाठीचं कॅन्सलेशन तेव्हाच करता येऊ शकतं, ज्यावेळी याचं स्टेटस एखाद्या दुसऱ्या वस्तूवर स्विच होईल. फ्लिपकार्टने पुन्हा कॉन्टॅक्ट करण्याचा दावा केला आणि Flipkart Wishmasters पर्याय आला.
त्यांनी पुन्हा एकदा फ्लिपकार्ट सपोर्टला कॉल करण्याचा निर्णय घेतला. अनेक प्रयत्नांनंतर फ्लिपकार्टने अखेरीस त्यांची ऑर्डर रद्द केली आणि रिफंड सुरू केलं. काही दिवसांनंतर त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झाले.
अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी अतिशय महत्वाची बाब - फ्लिपकार्टवर ओपन बॉक्स डिलिव्हरी हा पर्याय त्यांनी निवडला होता आणि अनबॉक्सिंग व्हिडीओ रेकॉर्डिंग अर्थात बॉक्स ओपन करताना त्याचा व्हिडीओ काढला होता. त्यामुळे त्यांना पैसे परत मिळण्यास मदत झाली. जर ऑर्डर स्वीकारली गेली असती, तर परिस्थिती कठीण झाली असती. त्यामुळे कोणतीही महागडी वस्तू खरेदी करताना नेहमी ओपन बॉक्स डिलिव्हरी पर्याय निवडणं फायद्याचं ठरतं.