स्मार्टफोनमध्ये सतत हॉटस्पॉटचा वापर केल्याने फोन लवकर खराब होऊ शकतो. त्यामुळे हॉटस्पॉटचा वापर करताना, काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
कोरोना काळात लॉकडाउनमुळे अनेक लोक घरीच आहेत. अनेकांना वर्क फ्रॉम होम (Work From Home) असल्याने इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोबाईल हॉटस्पॉटचा (HotSpot) वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. पण स्मार्टफोनमध्ये सतत हॉटस्पॉटचा वापर केल्याने फोन लवकर खराब होऊ शकतो. त्यामुळे हॉटस्पॉटचा वापर करताना, काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
सतत मोबाईल हॉटस्पॉट वापरल्यास, मोबाईल फोनची बॅटरी लवकर संपते. त्यामुळे हॉटस्पॉट सुरू केल्यानंतर इतर अॅप बंद करा.
इतर अॅप फोनच्या बॅकग्राउंडला सुरू राहिल्याने त्याचा बॅटरीवर परिणाम होतो. त्यामुळे हॉटस्पॉट ऑन केल्यानंतर नोटिफिकेशन, ब्राईटनेस, लोकेशन ऑफ ठेवा.
मोबाईल हॉटस्पॉट काम झाल्यानंतर बंद करा. त्यामुळे बॅटरीवर कमी परिणाम होईल. हॉटस्पॉट ऑन असताना, मोबाईल पॉवर सेव्हिंग मोडवर ठेवणं फायद्याचं ठरतं.