JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Bike Tips: पावसात बाईक अचानक बंद पडली तर करा ‘हे’ काम, लगेच होईल सुरु

Bike Tips: पावसात बाईक अचानक बंद पडली तर करा ‘हे’ काम, लगेच होईल सुरु

Bike Tips in Rainy Season: दुचाकी चालकांना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. पावसात तुमची बाईक, स्कूटी अचानक बंद पडली तर तुम्ही काही पद्धती अवलंबून ती पुन्हा सुरू करू शकता.

जाहिरात

Bike Tips: पावसात बाईक अचानक बंद पडली तर करा ‘हे’ काम, लगेच होईल सुरु

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 जुलै: सध्या पावसाळा सुरु आहे. देशाच्या विविध भागात दमदार पाऊसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं लोक आनंदी आहेत. पावसाळ्यामुळं वातावरण आल्हाददायक होतं, उष्णतेपासून सुटका होते, परंतु तरीही पावसाळा आपल्यासोबत काही समस्याही घेऊन येतो. पावसाळ्यात रस्त्यांवरची वाहतूक कोंडी, लाईट जाण्याची समस्या, पाणी साचणं, खड्डे अशा अनेक समस्यांमधून मार्ग काढावा लागतो. खासकरून दुचाकी चालकांना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं किंवा एखाद्या अंडरपासमध्ये पाणी साचलं की, पाणी टू व्हीलरमध्ये शिरतं. त्यामुळे गाडी थांबते आणि नंतर लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावे लागते. अशा परिस्थितीत पावसात तुमची बाईक, स्कूटी अचानक बंद पडली तर तुम्ही काही पद्धती अवलंबून ती पुन्हा सुरू करू शकता. चला तर मग पावसात बाईक अचानक बंद पडल्यास (start bike in rain if suddenly stop working) काय करावं, याबद्दल आज जाणून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही बाइक करू शकता स्टार्ट-  स्टेप 1 - तुम्हाला सर्वप्रथम स्पार्क प्लग काढून घ्यावा लागेल. कारण पावसात चिखल झाल्यामुळे स्पार्क प्लगचे खराब होतात आणि नंतर चिखल बराच काळ त्यावर राहिल्यास ते काढणे कठीण होते. हेही वाचा:   Aadhaar Card: तुमचं आधारकार्ड दुसरं कुणी वापरत नाही ना? अशी चेक करा हिस्ट्री स्टेप 2- आता बाईकमध्ये पाणी शिरले आहे का ते पाहावे लागेल. जर पाणी गेलं असेल, तर तुम्हाला तुमची बाईक आळीपाळीने दोन्ही बाजूंनी टेकवावी लागेल. मग तुम्हाला बाईकची बॅटरी ताबडतोब डिस्कनेक्ट करावी लागेल. असे केल्यानं बाईकमध्ये लावलेली इलेक्ट्रिक सिस्टीम सुरक्षित राहील. स्टेप 3- त्यानंतर बाईक कोरडी होऊ द्या आणि मग तुम्ही काढून टाकलेला प्लग आणि बॅटरी इ. पुन्हा घालावी लागेल. यानंतर जर तुम्ही बाईक स्टार्ट केली तर त्यात दुसरी कोणतीही अडचण नसेल तर ती सुरू होऊ शकते. जर पावसाचे पाणी तुमच्या बाईकमध्ये शिरलं असेल आणि वर नमूद केलेल्या गोष्टींनंतरही ती सुरू होत नसेल, तर तुम्ही ताबडतोब मेकॅनिककडे जावं किंवा तुम्ही सर्व्हिस सेंटरमध्येही जाऊ शकता. याच्या मदतीने तुमची बाइक पुन्हा दुरुस्त होऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या