JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / मोबाईलला हातही न लावता लॅपटॉप-कॉम्प्युटरवरून पाठवा मेसेज, पाहा सोप्या ट्रिक्स

मोबाईलला हातही न लावता लॅपटॉप-कॉम्प्युटरवरून पाठवा मेसेज, पाहा सोप्या ट्रिक्स

लॅपटॉप (Laptop) किंवा पीसीवर (PC) काम करत असताना मेसेज (Message) पाठवायचा असेल, तर आपण नेहमीच फोनचा वापर करतो, मग तो फोन Android असो किंवा Apple आयफोन; पण आपल्याला माहीत आहे का, की आपण फोनचा वापर न करतासुद्धा आपल्या PC द्वारे मेसेज पाठवू शकतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जुलै : लॅपटॉप (Laptop) किंवा पीसीवर (PC) काम करत असताना मेसेज (Message) पाठवायचा असेल, तर आपण नेहमीच फोनचा वापर करतो, मग तो फोन Android असो किंवा Apple आयफोन; पण आपल्याला माहीत आहे का, की आपण फोनचा वापर न करतासुद्धा आपल्या PC द्वारे मेसेज पाठवू शकतो. यासाठी काही अशी अ‍ॅप्स (Apps) आहेत, जी आपल्या फोनला PC सोबत सिंक (Sync) करतात. त्यामुळे आपल्याला PC वरूनच मेसेज पाठवणं किंवा प्राप्त करणं सहज शक्य होतं. जोपर्यंत आपला फोन PC सोबत सिंक आहे, तोपर्यंत आपल्याला मेसेज पाठवण्यासाठी मोबाइल हातात घेण्याची आवश्यकता नाही. यामुळे आपल्याला काम करताना दोन-दोन गॅजेट्स (Gadget) वापरण्याची आवश्यकता नाही. तसंच एका स्क्रीनवरून दुसर्‍या स्क्रीनवर स्विच होण्याचीसुद्धा आवश्यकता नाही. एअरड्रॉइड (AirDroid) : AirDroid हे कम्प्युटरवरून मेसेज पाठविण्यासाठीच्या अॅपपैकी जगातलं एक सुप्रसिद्ध नाव आहे. फाइल ट्रान्सफर (File Transfer), बॅकअप (Backup) आणि सिंक (Sync), कॉन्टॅक्ट मॅनेजमेंट (Contact Management) आणि आपल्या कम्प्युटरवरून स्क्रीनशॉट रेकॉर्ड (Screenshot Record) करणं ही या अ‍ॅपची काही वैशिष्ट्यं आहेत. आपल्याकडे याचं प्रीमियम व्हर्जन (Premium Version) असल्यास मोठ्या फाइल्स (files), फोल्डर्स (Folders) आणि अमर्यादित संख्येने फाइल्स ड्राइव्ह (Drive) करू शकता. परंतु फ्री व्हर्जनमध्ये (Free Version) काम करताना युजरला काही मर्यादा येऊ शकतात. मायक्रोसॉफ्ट युवर फोन (Microsoft Your Phone) : Microsoft Your Phone हे मायक्रोसॉफ्ट विंडोज (Microsoft Windows) आणि अँड्रॉइड (Android) फोनसाठी मोबाइल-फ्रेंडली अ‍ॅप (Mobile Friendly app) आहे. आपली सर्व कामं व्यवस्थितपणे पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे PC आणि फोन अशा दोन्ही व्हर्जन्स इंस्टॉल असणं आवश्यक आहे. याच्या नवीन व्हर्जनद्वारे फोन कॉल करणं आणि आपल्या स्क्रीनला मिरर करणंसुद्धा शक्य होतं. विंडोज PC वापरत असलेला कोणीही युजर याचा वापर करू शकतो. विशेष म्हणजे हे पूर्णपणे फ्री आहे. मायटी टेक्स्ट (Mighty Text) : बर्‍याच लोकांचा Mighty Text हा एक आवडता प्लॅटफॉर्म आहे. या अ‍ॅपच्या फ्री व्हर्जनद्वारे आपल्याला दरमहा 250 मेसेज पाठवता येतात. तसंच $6.99/ प्रति महिना इतकी रक्कम भरून प्रीमियम व्हर्जन घेता येतं. प्रीमियम व्हर्जनमध्ये टेक्स्टची (Text) कोणतीही मर्यादा नसेल. आपण कितीही मेसेज पाठवू शकता. यामुळे आपल्याला लाइव्ह इन्फॉर्मेशनसुद्धा (Live Information) मिळवता येते. सोबतच याचे काही अधिकचे फायदेही (Extra Benefit) आहेत. जॉइन (Join) : Join हा आपल्या कम्प्युटरवरून टेक्स्ट आणि SMS पाठविण्यासाठीचा एक लेटेस्ट (Latest) पर्याय आहे. आपण आपल्या फोनऐवजी केवळ ब्राउझरचा (Browser) वापर करून महत्त्वाची कामं याद्वारे पूर्ण करू शकता. हे सॉफ्टवेअर अ‍लर्टचीसुद्धा माहिती देतं. हे अॅप डिव्हाइसदरम्यान आपले क्लिपबोर्ड (ClipBoard) शेअर करू शकेल. टास्कर आणि Google Assistant बरोबरही त्याला जोडता येतं. त्यातून फाइल्सही पाठवता येतात, स्क्रीनशॉट घेता येतात. तसंच लोकेशनही (Location) याद्वारे शेअर करता येतं. माय एसएमएस (My sms) : या अ‍ॅपच्या दाव्यानुसार हा ब्राउझर प्लगइनशिवाय (Plug in) कार्य करतो. iOS, Android, Microsoft Windows, iPad आणि MaciOS सोबतच Chrome Extension साठी देशी अॅप्लिकेशनसह हे सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. याचं सदस्यता शुल्कदेखील (Membership Fee) इतरांपेक्षा कमी आहे. अशा प्रकारे आपण या सॉफ्टवेअर्सचा वापर करून एकाच वेळी अनेक डिव्हाइस न हाताळता मेसेज पाठवू शकता. यामधली बरीच सॉफ्टवेअर्स आपल्याला मोफत चांगली सेवा देतात. आपण काम करत असताना मेसेज पाठवण्यासाठी नक्कीच या सॉफ्टवेअरचा वापर करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या