Instagarm अतिशय पॉप्युलर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यात Stories साठीचंही फीचर देण्यात आलं आहे. युजर्स 24 तासांसाठी Stories ठेवू शकतात. Stories ठेवल्यानंतर युजर्सला त्यांच्या Stories कोणी पाहिल्या हे तपासताही येतं.
अनेकदा एखाद्या युजरची Instagram Story आपण पाहतो, पण आपण ती स्टोरी पाहिली हे त्या युजरला समजू नये असं वाटतं.
महत्त्वाची बाब म्हणजे, जर तुम्हाला एखाद्या प्रायव्हेट अकाउंटच्या Instagram Stories सीक्रेटली पाहायच्या असतील, तर तुम्ही ते प्रायव्हेट अकाउंट फॉलो करणं गरजेचं आहे. पब्लिक अकाउंटसाठी हे गरजेचं ठरत नाही.
Instagram Stories सीक्रेटली पाहण्यासाठी, स्टोरीज ओपन करण्याआधी तुमचा फोन फ्लाइट मोडवर करा. Instagram आपोआप अनेक स्टोरीज प्रीलोड करतो. त्यामुळे युजर विना डेटा कनेक्शनही प्रीलोड स्टोरीज पाहू शकतो.
परंतु अशा Apps आणि साइट्स सिक्योर नसतात. त्यामुळे असे Thirty Party Apps डाउनलोड करताना सावध राहण्याची गरज आहे.