WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. दूर असेलल्या व्यक्तीलाही व्हॉट्सअॅप व्हॉईस कॉल, व्हिडीओ कॉल करुन त्याच्या संपर्कात राहता येतं.
WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. दूर असेलल्या व्यक्तीलाही व्हॉट्सअॅप व्हॉईस कॉल, व्हिडीओ कॉल करुन त्याच्या संपर्कात राहता येतं. फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगची सुविधा असते. व्हॉट्सअॅपने असं कॉल रेकॉर्डिंग फीचर दिलेलं नाही. परंतु एक अशी ट्रिक आहे, ज्याद्वारे युजर्स व्हॉट्सअॅप कॉलही रेकॉर्ड करू शकतात. यासाठी थर्ड पार्टी अॅपचा वापर करावा लागेल.
WhatsApp Call रेकॉर्ड करण्याआधी, कॉल करणाऱ्या व्यक्तीची परवानगी घेणं गरजेचं आहे. युजरची परवानगी घेतल्यानंतरच व्हॉट्सअॅपवर कॉल रेकॉर्ड करा. एखाद्याच्या परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करू नये.
व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करण्यासाठी सर्वात आधी गुगल प्ले स्टोरवरुन Call Recorder- Cube ACR अॅप डाउनलोड करावं लागेल.
यात कोणताही Error आल्यास रेकॉर्डर सेटिंग ओपन करा आणि व्हॉईस कॉल रुपात Force VoIP कॉल सिलेक्ट करा.
आता पुन्हा कॉल करा आणि व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करण्यासाठी पुन्हा हीच प्रोसेस वापरा. WhatsApp आपल्या अॅपमध्ये कॉल रेकॉर्डिंगचं कोणतंही फीचर देत नाही. हे थर्ड पार्टी अॅप युजर्स आपल्या रिस्कवर डाउनलोड करू शकतात.