JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Aadhaar Card: ना भिजणार ना फाटणार! केवळ 50 रुपयांत मिळवा PVC आधार कार्ड, फॉलो करा ही प्रोसेस

Aadhaar Card: ना भिजणार ना फाटणार! केवळ 50 रुपयांत मिळवा PVC आधार कार्ड, फॉलो करा ही प्रोसेस

PVC Aadhaar Card: आधार कार्ड जाड कागदावर छापलं जातं. ते लॅमिनेटेड असलं तरीही जास्त दिवस टिकेल असं नाही. आधार कार्ड कागदाचं असल्यानं भिजण्याचा, फाटण्याचा धोका असतो. परंतु आता लोकांची ही समस्या दूर होऊ शकते.

जाहिरात

Aadhaar Card: ना भिजणार ना फाटणार! केवळ 50 रुपयांत मिळवा PVC आधार कार्ड, फॉलो करा ही प्रोसेस

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 जुलै: आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे. एकीकडे आधार सक्ती नाही, परंतु आधारकार्ड नसेल तर अनेक कामं रखडतात. बँकेत खातं उघडण्यापासून ते कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेणे असो, आधार कार्डची गरज भासते. पत्त्याचा पुरावा म्हणूनही आधार कार्डचा सर्वाधिक वापर केला जातो. नवीन सिम घेण्यापासुन ते अगदी सरकारी अनुदानाचा लाभ घेणं, अगदी कोरोनाची लस (कोविड-19 लसीकरण) घ्यायची असेल तरीही आधारकार्ड दाखवावं लागते. या समस्या होतील दूर- आधार कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे. अशा उपयुक्त कागदपत्राची काळजी घेणं आवश्यक आहे. पारंपारिक आधार कार्ड जाड कागदावर छापलं जातं आणि ते लॅमिनेटेड असतं. यानंतरही त्याचे आयुष्य फार जास्त नाही. कागदाचं असल्यानं ते भिजण्याचा किंवा फाटण्याचा धोका असतो. तुमच्यासोबतही अनेकदा असं घडलं असेल आणि तुम्हाला अनावश्यक समस्यांना सामोरे जावे लागलं असेल. मात्र, आता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) लोकांचा ही समस्या दूर केली आहे. कमी खर्चात त्रासापासून मुक्ती- आता तुम्ही PVC आधार कार्ड बनवू शकता. पॉलीविनाइल क्लोराईड (PVC) असतात. तुम्ही ते तुमच्या वॉलेटमध्ये सहज ठेवू शकता. याशिवाय ते ऑर्डर करणं देखील खूप सोपं आहे. तुमच्या मोबाईलच्या मदतीनं तुम्ही घरबसल्या PVC आधार कार्ड मिळवू शकता. आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे आता तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे PVC आधार कार्ड एका मोबाईल नंबरवरून ऑर्डर करू शकता. यासाठी खूप पैसे खर्च करण्याची गरज नाही. हे आधार कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त 50 रुपये खर्च करावे लागतील, ज्यामध्ये स्पीड पोस्टचा खर्च देखील जोडलेला आहे. हेही वाचा-  बापरे! 3-3 बैलांनी एकत्र महिलेला शिंगांनी उडवून पायाखाली तुडवलं; अंगावर काटा आणणारा VIDEO घरबसल्या करा अर्ज- युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)ने PVC आधार कार्ड मिळवण्याची प्रक्रिया अतिशय सोपी केली आहे. यासाठी तुम्हाला प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट (https://uidai.gov.in) वर जावे लागेल. त्यानंतर तुम्ही ‘माय आधार सेक्शन’मधील ‘ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड’ वर क्लिक करा. तुम्ही ऑर्डर आधार पीव्हीसी कार्डवर क्लिक करताच, तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी ईआयडी द्यावा लागेल. आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली सुरक्षा कोड किंवा कॅप्चा कोड टाका. त्यानंतर Send OTP वर क्लिक करा. आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल. OTP टाकल्यानंतर, खाली दर्शविलेल्या सबमिट बटणावर क्लिक करा. त्यानंतर स्क्रीनवर पीव्हीसी कार्डची प्रिव्ह्यू कॉपी दिसेल, ज्यामध्ये तुमच्या आधारशी संबंधित तपशील असेल. सर्व माहिती एकदा पडताळून पहा. त्यानंतर ऑर्डर द्या. जर तुमचा मोबाईल नंबर आधार डेटाबेसमध्ये नोंदणीकृत नसेल, तर Request OTP समोर क्लिक करा. हा पर्याय निवडल्यानंतर, तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर विचारला जाईल, नवीन मोबाइल नंबर प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला सेंड ओटीपी बटणावर क्लिक करावं लागेल. 15 दिवसांत उपलब्ध होईल PVC कार्ड- शेवटी, पेमेंट करण्याचा पर्याय येईल. तुम्ही UPI, नेट बँकिंग किंवा कार्डद्वारे 50 रुपये भरू शकता. त्यानंतर आधार पीव्हीसी कार्ड मागवलं जाईल. काही दिवसांनी पीव्हीसी आधार कार्ड स्पीड पोस्टद्वारे तुमच्या घरी पोहोचेल. ऑर्डर दिल्यानंतर घरी पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त 15 दिवस लागतील. PVC आधार कार्ड अनेक प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. सुरक्षिततेसाठी, या नवीन कॉर्डमध्ये होलोग्राम, गुइलोचे पॅटर्न, घोस्ट इमेज आणि मायक्रोटेक्स्ट सारखी वैशिष्ट्ये आहेत. नवीन पीव्हीसी आधार कार्डमुळे, क्यूआर कोडद्वारे कार्ड वेरिफाय करणं देखील सोपं झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या