WhatsApp वर एखाद्याला रिप्लाय करताना इतरांना तुमचं Online स्टेटस दिसतं. अनेकांना हे ऑनलाइन स्टेटस लपवायचं असतं. यासाठी कोणतीही ऑफिशियल पद्धत नाही. परंतु काही स्टेप्स फॉलो करुन तुम्ही रिप्लाय करताना ऑनलाइन स्टेटस लपवू शकता आणि इतरांच्या मेसेजला रिप्लायही देऊ शकता.
चॅट करताना किंवा एखाद्याला मेसेज करताना WhatsApp चं ऑनलाइन स्टेटस हाइड करण्यासाठी थर्ड पार्टी App चीही मदत घेता येते. परंतु या Apps मुळे सिक्योरिटी रिस्क असते.
त्यामुळे कोणत्याही थर्ड पार्टी App शिवाय मेसेजला रिप्लाय करताना ऑनलाइन स्टेटस लपवण्याचा एक सोपा आणि सुरक्षित पर्याय आहे.
जर तुम्ही मेसेजचा रिप्लाय नोटिफिकेशनमधूनच दिला, तर समोरच्या व्यक्तीला किंवा इतरांनाही तुम्ही ऑनलाइन असल्याचं दिसणार नाही.
नोटिफिकेशनमध्ये WhatsApp मेसेजच्या रिप्लाय ऑप्शनवर क्लिक करुन मेसेज टाइप करुन पाठवा. यामुळे ऑनलाइन स्टेटस हाइड करता येईल.