जर तुम्हाला एखाद्याशी Chat करताना Typing स्टेटस हाइड करायाचं असेल किंवा मोठा मेसेज टाइप करताना तो ड्राफ्ट करायचा असेल, तर एक सोपी प्रोसेस आहे. यामुळे तुम्ही Typing करताना तुमचं Typing Status लपवू शकता. WhatsApp कडून Typing Status हाइड करण्यासाठी कोणतीही अधिकृत प्रोसेस नाही, परंतु टायपिंग स्टेटस एका ट्रिकने लपवता येऊ शकतं.
Typing सुरू करण्याआधी सर्वात आधी फोनचा Flight Mode अॅक्टिव्ह करावा लागेल किंवा डेटा बंद करावा लागेल.
मेसेजच्या बाजूला Clock आयकॉन दिसेल. ज्यावेळी फ्लाइट मोड डिसेबल कराल किंवा डेटा ऑन कराल, त्यावेळी मेसेज आपोआप सेंड होईल. ज्याला मेसेज पाठवला त्याला तुम्ही टाइप करत असल्याचं समजणार नाही.