Instagram वर Reels अतिशय पॉप्युलर फीचर आहे. Tiktok प्रमाणेच असणाऱ्या या फीचरमध्ये शॉर्ट व्हिडीओ बनवता येतात. व्हिडीओसह Editing आणि Effects चाही वापर करता येतो. अनेकांना Instagram Reels डाउनलोड करायचे असतात. पण त्याची प्रोसेस माहिती नसते. एका सोप्या ट्रिकद्वारे काही सेकंदात आवडते इन्स्टाग्राम रील्स डाउनलोड करता येतील.
Instagram Reels डाउनलोड करण्यासाठी अनेक पद्धती आहेत. इन्स्टाग्राम रील्स डाउनलोड करुन आपल्या फोन मेमरीमध्ये सेव्ह करता येतात. यासाठी थर्ड पार्टी App किंवा वेबसाइटचाही वापर केला जातो.
पण थर्ड पार्टी App शिवायही Instagram Reels डाउनलोड करता येतात. एका ट्रिकद्वारे तुम्ही रील्स अँड्रॉईड फोनमध्ये सेव्ह करू शकता.
जर रिल्स विना ऑडिओ डाउनलोड करायचं असेल, तर Mute वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर डाउनलोडवर क्लिक करून Reels फोन गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता.