JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / तुम्ही विकत घेतलेला सेकंड हॅण्ड मोबाईल चोरीचा तर नाही? आता 2 मिनिटांमध्ये कळणार!

तुम्ही विकत घेतलेला सेकंड हॅण्ड मोबाईल चोरीचा तर नाही? आता 2 मिनिटांमध्ये कळणार!

c

जाहिरात

तुमचा मोबाईल चोरीचा तर नाही? असं चेक करा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 मे : ऑनलाईन किंवा दुकानातून सेकंड हॅण्ड मोबाईल विकत घेत असताना अनेकवेळा सावध असावं लागतं, कारण गॅजेट्स विकणाऱ्या अनेक साईटवर चोरीचे फोनही विकले जातात. पण आता तुम्ही विकत घेत असलेला सेकंड हॅण्ड फोन चोरीचा आहे का नाही, हे लगेच कळणार आहे. भारतीय दूरसंचार मंत्रालयाने साथी पोर्टल लॉन्च केलं आहे, यात तुम्ही तुमच्या सेकंड हॅण्ड फोनबद्दलची पूर्ण माहिती मिळवू शकता. तसंच या पोर्टलवर हरवलेला फोन ब्लॉक करण्याची आणि ट्रॅक करण्याची सुविधाही मिळते. संचार साथी “Know Your Mobile” फिचर ग्राहकाला सेकंड हॅण्ड फोन विकत घेण्याआधी मोबाईलची ऑथेन्टिसिटी व्हेरिफाय करण्याचा पर्याय उपलब्ध करून देतो. सरकारच्या या निर्णयामुळे सायबर गुन्हेगारीवर आळा बसू शकतो. सेकंड हॅण्ड फोन कसा व्हेरिफाय कराल? तुम्ही सेकंड हॅण्ड फोनच्या IMEI नंबरवरून या पोर्टलवर फोन व्हेरिफाय करू शकता. - यासाठी तुम्ही जो फोन विकत घेणार आहात, त्यामध्ये *#06# डायल करा. - हा नंबर डायल केल्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर IMEI नंबर दिसेल. - हा IMEI नंबर कुठेतरी सेव्ह करून ठेवा - यानंतर Central Equipment Identity Register ची वेबसाईट https://www.ceir.gov.in/Device/CeirIMEIVerification.jsp वर जा - इकडे तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओटीपी टाकावा लागेल. - यानंतर तुम्हाला स्क्रीनवर IMEI नंबर टाकायचा ऑप्शन येईल. - इकडे IMEI नंबर टाकताच तुम्हाला स्टेटस दिसेल - इकडे ब्लॅक लिस्टेड, डुप्लीकेट किंवा ऑलरेडी इन यूज लिहिलेलं असेल तर समजून जा की तुमचा फोन चोरीचा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या