नवी दिल्ली, 20 जुलै: रेल्वेचं ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी अधिकतर लोक IRCTC चा वापर करतात. तिकीटाचं पेमेंट करण्यासाठी IRCTC अनेक पर्याय देतं. या पर्यायांमध्ये काही दिवसांपूर्वी आयआरसीटीसी ई-वॉलेटचा (IRCTC e-Wallet) पर्याय जोडण्यात आला आहे. IRCTC e-Wallet असं सिस्टम आहे, ज्यात अॅडव्हान्समध्ये पैसे जमा करू शकतो आणि तिकीट बुकिंग वेळी सहजपणे पेमेंट करता येतं. - IRCTC e-Wallet द्वारे तिकीट बुक करण्यासाठी सर्वात आधी IRCTC आयडी लॉगइन करावं लागेल. - त्यानंतर डिस्टिनेशन सिलेक्ट करुन, तारीख सिलेक्ट करावी लागेल. - आता तिकीटासाठीचा पर्याय सिलेक्ट करा आणि Book Now वर क्लिक करा. डिटेल्स रिव्ह्यू करुन कॅप्चा कोड टाका. त्यानंतर पेमेंटवर पर्यायावर क्लिक करा. - इथे पेमेंट गेटवेमध्ये IRCTC ई-वॉलेटवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर ट्रान्झेक्शन पासवर्ड टाकावा लागेल. - इथे कन्फर्मेशन पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल. त्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल आणि ई-वॉलेटमधून पेमेंट होईल. Aadhaar Card हरवल्यास चिंता नको, अशाप्रकारे मिळवता येईल परत IRCTC e-Wallet मध्ये कसे टाकाल पैसे? - e-Wallet बनवण्यासाठी सर्वात आधी IRCTC वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर आपल्या आयडीने लॉगइन करा आणि IRCTC e-Wallet वर टॅप करा. - इथे IRCTC e-Wallet Register Now पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. WhatsApp Chat आता आणखी सुरक्षित होणार; पाहा तुमच्यावर कसा परिणाम होणार - नवी विंडो ओपन होईल, त्यात पॅन कार्ड आणि आधार कार्ड डिटेल्स मागितले जातील. इथे संपूर्ण माहिती भरावी लागेल. 50 रुपये रजिस्ट्रेशन फी द्यावी लागेल. त्यानंतर बँकेशी ई-वॉलेट लिंक होईल. या वॉलेटमध्ये 100 ते 1000 रुपये ठेवता येऊ शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे, एकदा ई-वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर केल्यानंतर ते पुन्हा बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करता येणार नाहीत.