JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / Aadhaar Card बाबत समस्या आहे? या Helpline वर करा तक्रार

Aadhaar Card बाबत समस्या आहे? या Helpline वर करा तक्रार

देशातील प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. बँकिंगपासून रेशन कार्ड बनवण्यापर्यंतच्या कामांसाठी, तसंच सर्व सरकारी-खासगी कामांसाठीही आधार कार्डची (Aadhaar Card) गरज असते. आधार कार्डशिवाय कोणतंही काम होत नाही. अशात आधार अपडेट करणं, आधार कार्ड हरवणं किंवा आधारसाठी अप्लाय, नवे बदल करणं अशा अनेक समस्यांसाठी आधार केंद्रात जावं लागतं. परंतु आता आधार कार्डमध्ये माहिती अपडेट करणं सोपं होणार आहे.

0104

आधारसंबंधी कोणत्याही समस्येसाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबर 1947 वर ग्राहक कॉल करू शकतात. UIDAI ने ग्राहकांसाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबर दिला आहे. ही स्पेशल सर्विस ग्राहकांना 12 भाषांमध्ये मदत करेल. हिंदी, इंग्रजी, तेलुगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, मराठी, उडिया, उर्दु, आसामी, बंगाली या भाषांमध्ये हेल्पलाईन सपोर्ट मिळेल.

जाहिरात
0204

ग्राहक मेलद्वारेही तक्रार दाखल करू शकतात. यासाठी help@uidai.gov.in वर ग्राहक आपली समस्या पाठवू शकतात. UIDAI चे अधिकारी वेळोवेळी मेल चेक करतात आणि ग्राहकांच्या समस्यांचं निराकरण करतात. तक्रार सेल ई-मेलवर उत्तर देऊन समस्यांचं समाधान करतात.

जाहिरात
0304

UIDAI च्या वेबसाईटवरही आधारसंबंधी तक्रार दाखल करता येऊ शकते. यासाठी UIDAI च्या https://resident.uidai.gov.in/ च्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.

जाहिरात
0404

इथे संपर्कासाठी Ask Aadhaar वर क्लिक करा. ग्राहकाला आधार Executive शी लिंक केलं जाईल. इथे ग्राहक आपली समस्या सांगून मदत मिळवू शकतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या