JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / PAN Card हरवलंय? या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस

PAN Card हरवलंय? या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस

पॅन कार्ड (PAN Card) इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून जारी केलं जातं. यात 10 डिजिट यूनिक अल्फा न्यूमेरिक नंबर असतात. याच्या प्लास्टिक कार्डला PAN कार्ड बोललं जातं.

0106

परमनेंट अकाउंट नंबर अर्थात पॅन कार्ड (PAN Card) इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून जारी केलं जातं. यात 10 डिजिट यूनिक अल्फा न्यूमेरिक नंबर असतात. याच्या प्लास्टिक कार्डला PAN कार्ड बोललं जातं. हे अतिशय महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे.

जाहिरात
0206

जर तुमचं पॅन कार्ड हरवलं असेल, तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. नव्या लाँच Income Tax वेबसाइटवरुन तुम्ही e-PAN काही मिनिटांत डाउनलोड करू शकता.

जाहिरात
0306

e-PAN डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी इन्कम टॅक्स वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/foportal वर जावं लागेल. इथे e-PAN डाउनलोड करण्यासाठी एक 'Instant E PAN' पर्याय दिसेल.

जाहिरात
0406

'Instant E PAN' वर क्लिक करावं लागेल. यावर क्लिक केल्यानंतर 'New E PAN' वर क्लिक करावं लागेल. इथे तुमचा पॅन नंबर टाकावा लागेल. जर तुम्हाला पॅन नंबर आठवत नसेल, तर आधार नंबरही टाकता येतो.

जाहिरात
0506

इथे अनेक प्रकारच्या टर्म्स अँड कंडिशन्स देण्यात आले आहेत. ते लक्षपूर्वक वाचून नंतर Accept वर क्लिक करा. त्यानंतर मोबाईल नंबरवर OTP पाठवला जातो. तो टाकून कन्फर्म करा.

जाहिरात
0606

तुमचं PAN ईमेल आयडीवर PDF फॉर्मेटमध्ये सेंड केलं जाईल. ईमेल ओपन करुन तुमचं e-PAN डाउनलोड करू शकता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या