Google ने मे महिन्यात यावर्षाच्या अखेरपर्यंत टू-स्टेप वेरिफिकेशन अनिवार्य केलं जाण्याची घोषणा केली होती. आता कंपनीने यासाठीची तारीख निश्चित केली आहे. ज्यावेळी युजर Google Account Login करेल, त्यावेळी वन टाइम पासवर्ड अर्थात OTP सह एक SMS किंवा ईमेल मिळेल. या प्रोसेसमुळे तुमच्या वैयक्तिक डेटाच्या सुरक्षेसाठी आणखी एक अतिरिक्त सुरक्षा मिळेल.
9 नोव्हेंबरपासून आपोआप Two-Step Verification अॅक्टिव्ह होईल. या प्रोसेसमध्ये पासवर्ड टाकल्यानंतर फोनवर पुढील टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनची स्टेप पूर्ण करावी लागेल. 9 नोव्हेंबरआधीही तुम्ही ही प्रोसेस पूर्ण करू शकता.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 2021 च्या अखेरपर्यंत Two-Step Verification मध्ये 150 मिलियन Google युजर्ससाठी या प्रोसेसची योजना आखली जात आहे.
सध्या Two-Step Verification सर्वांसाठी अनिवार्य करण्यात आलेलं नाही. हळू-हळू ही प्रोसेस सर्व युजर्ससाठी लागू होणार आहे.
जर अद्यापही तुमच्या Google Account चं टू-स्टेप वेरिफिकेशन डिसेबल असेल, तर ते मॅन्युअली इनेबल करू शकता.