JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / आता ATM मधून निघणार धान्य; 5 मिनिटांत 70 किलो गहू-तांदूळ, देशातलं पहिलं Grain ATM सुरू

आता ATM मधून निघणार धान्य; 5 मिनिटांत 70 किलो गहू-तांदूळ, देशातलं पहिलं Grain ATM सुरू

रेशनसाठी लांबच लांब रांगा आता विसरा. धान्याचं ATM मशीन आलंय. पायलट प्रोजेक्ट म्हणून देशातील पहिलं ‘ग्रेन एटीएम’ सुरूही झालं. पाहा PHOTO कुठे, कसं ते कळेल.

0105

देशातील पहिले Grain ATM प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालं आहे. एका वेळी पाच ते सात मिनिटांत 70 किलो धान्य हे मशीन वितरित करू शकेल.

जाहिरात
0205

पायलट प्रोजेक्ट म्हणून गुरुग्राममध्ये हे धान्याचं ATM सुरू झालं आहे. हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला म्हणाले की, आता धान्य मिळविण्यासाठी ग्राहकांना सरकारी रेशन डेपोसमोर रांगेत उभे रहावे लागणार नाही

जाहिरात
0305

हे एक स्वयंचलित मशीन आहे, जे बँकेच्या एटीएमप्रमाणे कार्य करतं. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम अंतर्गत स्थापित केलेल्या यंत्राला ऑटोमेटेड, मल्टी कमोडिटी म्हणजे धान्य वितरण मशीन असं म्हणतात.

जाहिरात
0405

टच स्क्रीन सुविधा असलेलं बायोमेट्रिक मशीन यात आहे. लाभधारकाने आधार किंवा रेशन कार्डचा क्रमांक दिला की धान्य आपोआप बाहेर येईल.

जाहिरात
0505

गहू, तांदूळ आणि बाजरी असं तीन प्रकारचं धान्य सध्या या मशीनद्वारे वितरित करता येत आहे. देशात अन्यत्रही अशी धान्य ATM सुरू करण्याचा विचार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या