JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Oh no! आता गाडीवर बंधनकारक असलेला FASTag ही सुरक्षित नाही? कशी होतेय चोरी पाहा VIDEO

Oh no! आता गाडीवर बंधनकारक असलेला FASTag ही सुरक्षित नाही? कशी होतेय चोरी पाहा VIDEO

FASTag scam with smartwatch : स्मार्टवॉचने फास्टॅग स्कॅन करून अकाऊंटमधून चोरी केली जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जून : टेक्नॉलॉजीमुळे आर्थिक व्यवहार जितके सोपे झाले आहेत, तितकेच ते धोक्याचेही आहेत. कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्कॅमर्स आपल्या पैशांवर डल्ला मारतात. पेमेंट अॅपबाबत भीती तर वाटत होतीच पण आता देशात गाड्यांवर बंधनकारक करण्यात आलेला फास्टॅगनेही चिंता वाढवली आहे. फास्टॅगवरूनही चोरी होत असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यामुळे आता फास्टॅगच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे (FASTag scam with smartwatch). टोल प्लाझावर टोल कलेक्शन सोपं आणि सुरक्षित बनवण्यासाठी तसंच टोलनाक्यावर लागणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि ट्रॅफिक टाळण्यासाठी गाड्यांवर फास्टॅग लावणं देशात बंधनकारक करण्यात आलं. हा एक स्टिकर आहे, ज्यावर एक कोड असतो. हा स्टिकर बँक अकाऊंट किंवा ई-वॉलेटला जोडलेला असतो. जो स्कॅन करून तुमचा टोल घेतला जातो. पण हाच फास्टॅग स्मार्टवॉचनने स्कॅन करून चोरी केली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे वाचा -  Shocking! आकाशातून थेट जमिनीवरील कारवर कोसळलं विमान; भयंकर अपघाताचा VIDEO VIRAL व्हिडीओत पाहू शकता एक मुलगा कारची काच साफ स्वच्छ करताना दिसत आहे. त्याच्या हातात एक स्मार्टवॉच दिसत आहे. काच साफ करता करता तो हे वॉच फास्टटॅगवर टेकवतो आणि त्यानंतर आपल्या कामाचे पैसे न घेताच तिथून पळू लागतो. कारचालक त्याला हाक मारून मागे बोलवतो. तुझ्या कामाचे पैसे घेणार नाही का? असं विचारतो. मुलाच्या चेहऱ्यावर थोडी भीतीही दिसते आहे.

संबंधित बातम्या

त्यानंतर कारचालक त्याला त्याच्या हातातील स्मार्टवॉचबाबत विचारतो, तेव्हा तो मुलगा तिथून भीतीने तिथून पळून जातो. हे वाचा -  10 महिन्यांनी सापडला नदीत पडलेला आयफोन; फोनची अवस्था पाहून सर्वच थक्क कारचालकाने हा एक स्कॅम असल्याचा म्हटलं आहे. असं स्मार्टवॉचने फास्टटॅग स्कॅन करून पैशांची चोरी केली जात असल्याचा दावा त्याने केला आहे. हे नेमकं कसं केलं जातं हेसुद्धा त्याने सांगितलं आहे. आपल्यासोबत हे पहिल्यांदा नाही, याआधीही घडलं असल्याचं तो म्हणाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या