JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / आता Facebook तुम्हाला देणार 77 लाख, करा फक्त 'हे' काम

आता Facebook तुम्हाला देणार 77 लाख, करा फक्त 'हे' काम

लॉकडाऊनमध्ये दिवसभर फेसबुक वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वाचा कसे मिळवाल 77 लाख.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 मे : सध्या माणूस हा सोशल प्राणी झाला आहे. याचा अर्थ बाहेरच्या जगाशी संपर्क असलेला नाही तर, सोशल मीडियावर वेळ घालवणारा. आता तर लॉकडाऊनमध्ये दिवसरात्र लोकं फेसबुक, ट्विटर किंवा इन्स्टाग्रामवर पडीक असतात. मग मिम्स तयार करणं किंवा ते बनवत बसणं, हे असे नवीन उद्योग लोकं करू लागले आहेत. त्यामुळं आता तुमच्यासाठी फेसबुकनं एक खास स्पर्धा आणली आहे. या स्पर्धेतील विजेत्यास तब्बल 77 लाख मिळणार आहेत. सध्या लॉकडाऊनमध्ये तुम्ही घरात कैद आहात. त्यामुळं फेसबुकनं तुम्हाला दिलेलं हे कामही घरात बसूनच करायचे आहे. हे काम आहे गुंडगिरी आणि द्वेष पसरवणारे मेसेज थांबवणे. इंडिया टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुक द्वेषयुक्त व्हिडीओवर आता अंकुश ठेवणार आहे. यासाठी एक कृत्रिम प्रणाली (artificial intelligence ) तयार करण्यात आली आहे. यातून द्वेष पसरवणारे मेजेस आणि व्हिडीओ रोखले जाणार आहे, मात्र फेसबुकची ही प्रणाली मिम्स रोखू शकत नाही. त्यामुळं फेसबुकनं एक स्पर्धा आयोजित केली आहे, ज्यात जगभरातील टेकसॅव्ही लोकांना द्वेषयुक्त मिम्स रोखण्यासाठी एक artificial intelligence तयार करायचं आहे. या स्पर्धेतील विजेत्यास 77 लाख रुपये मिळणार आहेत. वाचा- बंपर डिस्काउंट! 62 हजारांचा फोन फक्त 22,999 रुपयांमध्ये, ऑफर फक्त एक दिवस यासाठी फेसबुक स्वत:चा डेटाबेसही देणार आहे. या स्पर्धेमागील कल्पना अशी आहे की, या artificial intelligenceच्या माध्यमातून विविध फोटोंचे विश्लेषण करता येईल. यातून द्वेष पसरवणारे मिम्स शोधले जाऊ शकतात. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ही स्पर्धा ड्राइव्हडेटा या टीमनं आयोजित केली आहे. डेटा एक्सपर्ट यात सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथं क्लिक करा. वाचा- फेसबुकने बदललं डिझाइन, Whatsapp नंतर पहिल्यांदाच दिलं ‘हे’ फीचर वाचा- WhatsApp वर मिळणार सर्वात मोठं फीचर, ग्रुप व्हिडिओ कॉलिंगसाठी ठरणार महत्वाचं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या