तुमचा पर्सनल डेटा हॅक होण्यापासून वाचवायचा असेल, तर अलर्ट व्हा. फोनमध्ये असे काही Apps असू शकतात, ज्यावर मालवेअर अटॅक झाला असेल. त्यामुळे युजरची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. रिसर्चर्सने एक नवा अँड्रॉईड ट्रोजन फ्लायट्रॅप मालवेअर व्हायरस (Flytrap) स्पॉट केला आहे, ज्याद्वारे युजर्सचा डेटा गुपचूप केला जात आहे.
Zimperium zLabs मोबाईल थ्रेट रिसर्च टीमने दिलेल्या माहितीनुसार, हा मालवेअर अतिशय सोप्या ट्रिकवर काम करतो. हा मालवेअर मॅलिशिअस अॅपमध्ये युजरच्या Facebook क्रेडेंशिअलद्वारे लॉगइन करायला सांगतो आणि त्यानंतर युजरचा डेटा चोरी केला जातो.
फ्लायट्रॅप व्हायरस वेगवेगळ्या मोबाईल अॅप्स, नेटफ्लिक्स कूपन कोड, गुगल अॅडवर्ल्ड कूपन कोड आणि बेस्ट फुटबॉल टीम वोटिंग आणि प्लेअरच्या नावाचा वापर करतो. हे अॅप्स डाउनलोड झाल्यानंतर युजर्सला अनेक प्रश्न विचारले जातात आणि त्याद्वारे फसवणूक केली जाते.
यात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर युजरला Facebook Login पेजवर रिडायरेक्ट केलं जातं. यात वोट देण्यासाठी फेसबुक अकाउंट लॉगइन करण्यासाठी सांगितलं जातं. यात युजरचा फेसबुक ID, लोकेशन, ईमेल अॅड्रेस आणि IP अॅड्रेस अॅक्सेस केला जातो.
रिसर्च टीमने गुगलला धोकादायक अॅप्सबाबत इशारा दिला आहे, जे गुगल प्ले स्टोरद्वारे फ्लायट्रॅप मालवेअर ट्रान्सफर करत आहे. आता गुगलने रिसर्च आणि वेरिफाय करुन मॅलिशिअस अॅप्स गुगल प्ले स्टोरवरुन हटवले आहेत. त्यामुळे तुमच्याकडेही असे Apps असल्यास ते लगेच डिलीट करा.
GG Voucher (com.luxcarad.cardid), Vote European Football (com.gardenguides.plantingfree), GG Coupon Ads (com.free_coupon.gg_free_coupon), GG Voucher Ads (com.m_application.app_moi_6), GG Voucher (com.free.voucher), Chatfuel (com.ynsuper.chatfuel), Net Coupon (com.free_coupon.net_coupon), Net Coupon (com.movie.net_coupon), EURO 2021 Official (com.euro2021)