चांद्रयान 3
सुरत, 08 जुलै : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येत्या काही दिवसांत चांद्रयान-3चं प्रक्षेपण करणार आहे. सुरतमधल्या अभियांत्रिकी कंपनीसाठीही हा अभिमानाचा क्षण असेल. या चांद्रयानामध्ये वापरलेले फायर-प्रूफ सिरॅमिक घटक या कंपनीने ‘इस्रो’ला पुरवले आहेत. या सिरॅमिक घटकाला “स्क्विब्ज” असं म्हणतात. ते फायरप्रूफ आहेत आणि 3000 अंश सेल्सिअस तापमानातही वितळणार नाहीत. हा घटक चांद्रयान-3 मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. फायरप्रूफ सिरॅमिक पार्ट्स सुरतच्या हिमसन इंडस्ट्रियल सिरॅमिक कंपनीने पुरवले आहेत. ही कंपनी गेल्या 30 वर्षांपासून इस्रोला स्क्विब्जचा पुरवठा करत आहे. चांद्रयान-2 मध्येही याच कंपनीच्या स्क्विब्जचा वापर करण्यात आला होता. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटामधल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून 14 जुलै रोजी चांद्रयान-3चं प्रक्षेपण होईल. यामध्ये इन्स्टॉलेशन आणि इग्निशनची भूमिका खूप महत्त्वाची आहे. चांद्रयान अवकाशात सोडलं जातं, तेव्हा त्याच्या खालच्या भागात एक प्रचंड स्फोट घडवून आणला जातो. त्यामुळे उष्णता निर्माण होते. त्या वेळी तिथलं तापमान सुमारे 3000 अंश सेल्सिअस असते. या अत्यंत उच्च तापमानामुळे लाँच व्हेइकलच्या तारा आणि वायरिंग जळू शकतं. अशा अत्यंत उच्च तापमानापासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी, या वायर्स आणि वायरिंग्जना सिरॅमिक कोटिंग आहे. या कोटिंगसाठी हिमसन कंपनीने पुरवलेले स्क्विब्ज वापरले आहेत. स्क्विब्ज उच्च तापमानापासून तारा आणि वायरिंगचं रक्षण करतात. थेट अंतराळातून 24 तास मिळू शकणार सौर ऊर्जा; संशोधकांच्या प्रयोगाला यश याविषयी बोलताना हिमसन सिरॅमिकचे डायरेक्टर निमेश बचकनीवाला म्हणाले, की त्यांची कंपनी 1994पासून सॅटेलाइट्स आणि अंतराळयानांसाठी आवश्यक सिरॅमिक कॉम्पोनंट्स तयार करत आहे. आमचे सिरेमिक कॉम्पोनंट्स चांद्रयान-1 आणि चांद्रयान-2मध्ये वापरले गेले आहेत आणि आता चांद्रयान-3मध्येही हे कॉम्पोनंट्स वापरले जाणार आहेत. स्पेस शटलला अंतराळात सोडण्याच्या वेळी लाँच व्हेइकलच्या खाली एक मोठा स्फोट केला जातो. त्या वेळी तिथे सुमारे 3000 अंश सेल्सिअस तापमान असतं. या अत्यंत उच्च तापमानामुळे अत्यावश्यक तारा आणि वायरिंग जळू शकतात. त्यासाठी हिमसनने पुरवलेल्या स्क्विब्जचा वापर केला जातो, जेणेकरून त्या अत्यंत उच्च तापमानातही सुरक्षित राहतील, असं त्यांनी सांगितलं. स्क्विब्ज कसे बनवले जातात निमेश बचकनीवाला म्हणाले, की त्यांची कंपनी पूर्वी कापड उद्योगासाठी कॉम्पोनंट्स बनवत होती. पोखरण अणुचाचणी स्फोटानंतर अनेक भारतीय कंपन्यांना अनेक देशांच्या निर्बंधांना सामोरे जावे लागले. त्या वेळी इस्रोने हिमसन इंडस्ट्रियल सिरॅमिक कंपनीशी संपर्क साधला आणि तेव्हापासून आम्ही इस्रोला कॉम्पोनंट्सचा पुरवठा करत आहोत. स्क्विब्ज अॅल्युमिनियमपासून बनवले जातात.