JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Chandrayaan-3 : चांद्रयान यशस्वी स्थिरावलं, पुढे काय? कधी ठेवणार चंद्रावर पाऊल

Chandrayaan-3 : चांद्रयान यशस्वी स्थिरावलं, पुढे काय? कधी ठेवणार चंद्रावर पाऊल

Chandrayaan-3 launched updates : इस्रोने आज चांद्रयान-3 चे यशस्वीपणे प्रेक्षपण केलं आहे. चांद्रयान-3 मोहिमेचे उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित चंद्रावर उतरणे हे आहे. यासोबतच चंद्राची रचना, भूगर्भशास्त्र आणि त्याच्या इतिहासाची नवीन रहस्ये शोधण्यावरही हे अभियान भर देणार आहे.

जाहिरात

चांद्रयान यशस्वी स्थिरावलं

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 14 जुलै : इस्रो आणि भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. कारण आज भारताचे महत्वाकांक्षी तिसरं चांद्रयान-3 मिशन लॉन्च झालं आहे. चांद्रयान-3 ने आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी यशस्वी उड्डाण केलं आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे अंतराळयान आज प्रक्षेपित करण्यात आलं आहे. इस्रोच्या या कामगिरीकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून होतं. सोशल मीडियावरही अनेकजण यशस्वी प्रेक्षपणाबद्दल शुभेच्छा देत आहेत. मात्र, या मिशन मागचा उद्देश तुम्हाला माहिती आहे का? चला सोप्या भाषेत जाणून घेऊ. इस्रोने 23-24 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंगची योजना आखली आहे, परंतु तेथील सूर्योदयानुसार त्यात बदल होऊ शकतो. चंद्राच्या पृष्ठभागाचं विश्लेषण करणं हे चांद्रयान -3 चं प्रमुख उद्दिष्ट आहे. यासोबतच भारताच्या या मोहिमेमुळे चंद्र मोहिमांसाठी आवश्यक असलेलं नवीन तंत्रज्ञान शोधण्यासाठीही मदत होईल. चांद्रयान -3 मोहिम यशस्वी झाल्यास चंद्रावर यान उतरवणारा भारत हा चौथा देश ठरेल. वाचा - भारताची ऐतिहासिक भरारी; तो महत्त्वाचा क्षण आला, चांद्रयान-3 अवकाशात झेपावलं चांद्रयान-३ मोहिमेची उद्दिष्टे:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या