मुंबई, 12 जुलै : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्याच (इस्रो) नाही तर संपूर्ण देशाच्या इतिहासात 14 जुलै 2023 हा महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील स्पेसपोर्टवरून चांद्रयान-3 उड्डाण करेल. चांद्रयान-3 ही भारताची तिसरी चांद्रमोहीम आहे. संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या या मोहिमेतील महत्त्वाचा वाटा मुंबईनं उचललाय. चांद्रयान ती या मोहिमेसाठी लागणारे इंजिन मुंबईत बनवण्यात आलंय. विक्रोळी येथील गोदरेज कंपनीच्या कारखान्यात त्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये तीन प्रमुख आणि 25 लहान इंजिनचा समावेश आहे. ही मोहीम 2019 चांद्रयान-2 मोहिमेचा एक भाग आहे. 2019 मध्ये, लँडर आणि रोव्हर चंद्रावर सॉफ्ट-लँड करू शकले नाहीत, ज्यामुळे मोहीम अयशस्वी झाली होती.
सुमारे 3.84 लाख किमी प्रवास केल्यानंतर, चांद्रयान-3 अंतराळयान 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे.चांद्रयान-3 अंतराळ यानामध्ये प्रोपल्शन मॉड्यूल (वजन 2,148 किलो), लँडर (1,723.89 किलो) आणि रोव्हर (26 किलो) यांचा समावेश आहे. गोदरेज एरोस्पेसचे सहायक उपाध्यक्ष मानेक बेहरामकामदिन यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, ‘आमची कंपनी तीन दशकांहून अधिक काळ अंतराळ विभागाच्या अंतर्गत असलेल्या इस्रो या संस्थेशी संलग्न आहे. इस्रोच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण घटकांच्या निर्मितीसह सहकार्याची सुरुवात झाली. त्यानंतर लिक्विड प्रोपल्शन इंजिनपर्यंत विस्तारित झाला. गोदरेज एरोस्पेसचे चांद्रयान 1 आणि 2 तसंच मंगळयान अंतराळ मोहिमांमध्ये योगदान होते, शिवाय इस्रोच्या इतर मोहिमांमध्ये भाग घेण्यात आला होता. ‘या’ दिवशी लाँच होणार चांद्रयान-3; पहिल्या दोन चांद्रमोहिमांपेक्षा ही मोहीम वेगळी कशी? अन्य प्रोजेक्टमध्येही योगदान डीआरडीओ कावेरी प्रोजेक्ट डीआरडीओचा कावेरी इंजिन जीटीआर प्रोजेक्ट म्हणजेच गॅस टरबाइन रिसर्च एस्टॅब्लिशमेंटमध्ये कावेरी इंजिन तयार करण्यातही गोदरेज कंपनीचा सहभाग आहे. अत्यंत महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प गोदरेजच्या सहकार्याने तयार होत आहे, ही बाबही महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेतील आमच्या योगदानाचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. ही मोहीम नक्की यशस्वी होईल आणि देशाचं नावं उंचावेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.