JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / मास्क घातलाय ना? सोशल डिस्टन्सिंग ठेवताय ना? तुमच्यावर लवकरच तिसऱ्या डोळ्याची नजर

मास्क घातलाय ना? सोशल डिस्टन्सिंग ठेवताय ना? तुमच्यावर लवकरच तिसऱ्या डोळ्याची नजर

कोरोनाव्हायरसच्या काळात तुम्ही आवश्यक नियमांचं पालन करत आहात की नाही यावर कॅमेऱ्याचं लक्ष असणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पॅरिस, 26 मे : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचावासाठी घराबाहेर पडताना मास्क (mask) घालणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं (social distancing) पालन करणं बंधनकारक आहे. तरीही लोकं त्याला गांभीर्याने घेत नाही. मास्क घालत नाहीत, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाहीत. असे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर लवकरच तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे. तुम्ही मास्क घातला आहे की नाही आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत आहात की नाही, यावर नजर ठेवणारा लेझर कॅमेरा तयार करण्यात आला आहे. फ्रान्समधील (france) कंपनीने असा कॅमेरा तयार केला आहे.  3 डी सिमँटिक कॅमेरा (3D-semantic camera) हा तुमच्यावर लक्ष ठेवणार आहे.

आऊटसाइट कंपनीने तयार केला आहे. कंपनीने सांगितल्यानुसार, हा कॅमेरा गर्दीच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवू शकतो. कोणत्या व्यक्तीने मास्क घातला नाही, कोणत्या व्यक्तीने सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडलेत याची माहिती हा कॅमेरा देणार आहे. शिवाय दूरूनच हा कॅमेरा प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचं तापमानही तपासणार आहे. जास्त शारीरिक तापमान असलेल्या व्यक्तीला हेरून त्याची माहिती तो कॉम्प्युटरला पुरवणार आहे. हे वाचा -  सावध राहा! कोरोनाचा दुसरा टप्पा असू शकतो जास्त धोकादायक, WHOचा इशारा गर्दीच्या ठिकाणी माणसांनी प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यापेक्षा हा कॅमेरा सर्वांवर एकाच वेळी लक्ष ठेवू शकतो. त्यामुळे अशा ठिकाणी हा कॅमरा खूप उपयुक्त ठरेल. लवकरच हा कॅमेरा सार्वजनिक ठिकाणी वापरात येईल, अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे. हे वाचा -  या 3 गोष्टींचं पालन केलं तरच कोरोनापासून दूर राहाल, ICMR ने दिला सुरक्षेचा मंत्र कोरोना  लॉकडाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरं

News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा
टॉप व्हिडीओज
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या