JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / रुग्णालयाने दिले नॉर्मल रिपोर्ट पण Apple Watch मुळे समोर आली धक्कादायक माहिती

रुग्णालयाने दिले नॉर्मल रिपोर्ट पण Apple Watch मुळे समोर आली धक्कादायक माहिती

रुग्णालयात महिला तंदुरुस्त असल्याचं सांगण्यात आलं पण अॅपल वॉचच्या माहितीनुसार गंभीर आजार असल्याचं समोर आलं. त्यानंतर वेळीच उपचार केल्यानं महिलेचे प्राण वाचले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 03 मे : अॅपल वॉचमुळे आतापर्यंत अनेकदा लोकांचा जीव वाचल्याचे प्रकार घडले आहेत. रुग्णालयात वापऱण्यात येणाऱ्या इसीजी उपकरणांनाही अॅपल वॉचनं आता मागं टाकलं आहे. European Heart Jouranl च्या एका रिपोर्टनुसार, अॅपल वॉचने त्याच्या इनबिल्ट इसीजी फीचरमुळे 80 वर्षीय महिलेला झालेल्या गंभीर आजाराचं निदान झालं. रुग्णालयानं महिलेला पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं सांगितलं होतं. पण महिलेच्या डोक्यात आणि छातीत दुखायला लागलं. त्यानंतर हृदयाचे ठोकेही वाढले. रुग्णालयात जेव्हा चेस्ट पेन युनिटमध्ये इसीजी टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट नॉर्मल आले होते. मात्र नंतर महिलेच्या अॅपल वॉचचे ईसीजी रेकॉर्डिंगमध्ये गंभीर आजार असल्याचं दाखवत होतं. त्यानंतर महिलेच्या हृदयाची पुन्हा तपासणी करण्यात आल्यानंतर धक्कादायक रिपोर्ट समोर आले. आजाराची माहिती मिळाल्यानंतर अँजिओप्लास्टी आणि स्टेंटचा वापर केल्यानंतर यशस्वी उपचार झाले. कार्डिओलॉजिस्टने म्हटलं की, स्मार्ट टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंटमुळे तपासाच्या नव्या शक्यता समोर येत आहेत. मोबाईल अॅप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर अॅपल वॉचच्या डिजिटल क्राउनवर बोट ठेवल्यानंतर ईसीजी नोंद करतं. त्यानंतर 30 एस ट्रेसिंग करून त्याची पीडीएफ फाइल स्टोअर होते. हे वाचा : Google Photos वर डिलिट झालेले फोटो-व्हिडिओ ‘असे’ मिळवा परत ECG फीचरमुळे जगभरातील अनेकांचे प्राण वाचले आहेत. याच अॅप वॉच सिरीज 6 मध्ये यावर्षी आणखी एक फिचर येणार आहे. त्या नव्या फीचरमुळे कोणत्याही रुग्णामध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशनची लेवल किती आहे समजेल. त्यामुळे फुफ्फुसाशी संबंधित आजाराची माहिती मिळू शकते. हे वाचा : Mobile app तुम्हाला जीवघेण्या कोरोनाव्हायरसपासून वाचवणार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या