08 मार्च : मोबाइल क्षेत्रात कायम आपला दबदबा निर्माण करणाऱ्या Apple कंपनीचा या वर्षातला पहिला इव्हेंट मोठ्या झोकात पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आयफोनची चर्चा होती अखेरीस तो iPhone SE लाँच झाला आहे. iPhone SE हा तुम्हाला अगदी XR सारखा दिसत असला तरी त्याचे फिचर्स हे आधीच्या फोनपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे, याची किंमत सुद्धा कमी असणार आहे. iPhone SE सह आयपॅड, आणि iphone 13 नवीन रंगात लाँच करण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे याहीही वेळी Apple ने जरा वेगळे आणि हटके असे प्रोडक्ट्स लाँच केले आहे. `पीक परफॉर्मन्स` Peek Performance नावाने यंदाचा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. यावेळी अॅपलने सर्वात स्वस्त असा iPhone SE आणला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या आयफोनची बाजारात चर्चा होती. हा फोन 5 जी असणार आहे. या फोनची स्क्रिनही 4.7 इंच असणार आहे. पण या फोनमध्ये तुम्हाला A15 बायोनिक चिपसेटवर असणार आहे. या फोनची किंमत 429 डॉलर म्हणजे, भारतात हीच किंमत 33 हजार इतकी असणार आहे. पुढील शुक्रवारपासून हा फोन तुम्हाला बूक करता येणार आहे. iPhone SE 3 ची भारतात किंमत43900 इतकी असण्याची शक्यता आहे. 64GB, 128GB आणि 256GB व्हेरिएंटमध्ये हा फोन उपलब्ध होणार आहे. पण, iPhone SE 3 च्या डिझाइनमध्ये असे कोणतेही बदल करण्यात आले नाही. जुनीच डिझाईन कायम आहे. फक्त या आयफोनमध्ये iPhone 13 सीरीजचे प्रोसेसर मिळणार आहे. कॅमेऱ्याचा विचार केला तर कोणताही बदल केला नाही. तोच 12 पिक्सेलचा कॅमेरा मिळणार आहे. यामध्ये फक्त अल्ट्रा वाईल्ड कॅमेरा दिला आहे. iPhone SE 3 ची विक्री 18 मार्चपासून सुरू होणार आहे. iPhone SE 3 ममध्ये फेस आयडी दिलेली नाही. तसंच iPhone SE 3 तीन रंगात पाहण्यास मिळणार आहे. या फोनमध्ये होम बटन कायम आहे. तसंच, iPad Air चे नवीन व्हर्जन लाँच करण्यात आले आहे. यामध्ये M1 चिपसेट दिली आहे. विशेष म्हणजे, एसई जुन्या डिझाईनसह नव्या रुपात लाँच झाला आहे. पण या माध्यमातून अॅपलची सर्वात स्वस्त आयफोन 5G क्षमता उपलब्ध झाली आहे. iPhone SE हा फोन 2020 मध्ये परत लाँच करण्यात आला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा नव्या दमाने हा फोन लाँच केला आहे. अॅपल Mac Studio व्हिडीओ एटिटिंगसाठी नावाजलेले Mac Studio आता नव्या रंगात आणि नव्या दमाने लाँच करण्यात आले आहे. आकर्षक डिझाईनसह Apple ने Mac Studio लाँच केला आहे. यामध्ये 64 कोर gpu दिलं आहे. यात न्यूरल इंजन आणि मीडिया इंजन आहे त्यामुळे Mac Studio चा परफ्रार्मन्स आणखी चांगला असणार आहे. यासोबतच Apple ने नवीन चिपसेट M1 Ultra लॉच केले आहे. आतापर्यंत iMac सर्वात फास्ट होते. आता त्याच्या 3 पट अधिक ताकदीचे हा Mac Studio असणार आहे. Mac Studio ची किंमत 3,999 अमेरिकी डॉलर्सपासून सुरू होणार आहे. Apple ने Mac Studio Display सुद्धा लाँच केला आहे. जो 5k सपोर्ट करणार आहे. तर Mac Studio Display ची किंमत 1499 डॉलर्स असणार आहे. भारतात अजून हे लाँच झाले नाही. त्यामुळे त्याची कोणतीही किंमत जाहीर केली नाही.