कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेक अकाउंट तयार झाल्यास, ते तक्रारीनंतर आता 24 तासाच्या आत ते कंपनीला हटवावं लागणार आहे. नव्या आयटी नियमांत हे नियम आणले गेले आहेत.
Facebook, Twitter, Instagram यासारख्या कोणत्याही खात्यात फेक फोटो असल्याची तक्रार कोणत्याही संबंधित व्यक्तीकडून आल्यास, कंपनीला तो फोटो 24 तासांच्या आत हटवावा लागेल, हे अनिवार्य करण्यात आलं आहे.
हे नियम नव्या आयटी नियमांत आणले गेले आहेत. आता सोशल मीडिया कंपन्यांना तक्रारीनंतर त्वरित त्यावर कारवाई करावी लागेल.
अभिनेता, खेळाडू, राजकारणी किंवा कोणत्याही सामान्य व्यक्तीने आपला फोटो दुसऱ्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केल्याबद्दल तक्रार करुन आक्षेप नोंदवला, तर कंपनीला ते अकाउंट बंद करावं लागेल.
काही लोक मोठ्या व्यक्ती किंवा इतर लोकांचा प्रोफाईल फोटो लावून फेक अकाउंट तयार करतात. फॉलोवर्स वाढवणं, संबंधित व्यक्तीवर निशाणा साधणं किंवा बेकायदेशीर कृत्य करणं हा त्यामागचा उद्देश, हेतू असू शकतो.