मुंबई, 20 नोव्हेंबर: सणासुदीच्या काळात अॅमेझॉन (Amazon New Offier) आपल्या ग्राहकांसाठी विविध ऑफर्स आणतं, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. आता ख्रिसमस वगळता या वर्षातले बऱ्यापैकी सर्व सण होऊन गेले आहेत. ख्रिसमसही जवळपास महिनाभर दूर आहे. तरीदेखील अॅमेझॉननं ग्राहकांसाठी एक खास प्रोग्राम सुरू केला आहे. अॅमेझॉनवर सध्या हेडसेट डेज (amazon headset days) सुरू आहेत. या प्रोग्रामअंतर्गत, ग्राहक त्यांच्या आवडत्या ब्रँड्सचे हेडफोन्स अतिशय स्वस्त दरात खरेदी करू शकतात. अॅमेझॉनवर 20 नोव्हेंबरपर्यंत हेडसेट डेज प्रोग्राम सुरू असेल. म्हणजेच आज या ऑफरचा शेवटचा दिवस आहे. या ऑफरमध्ये वनप्लस (Oneplus), सॅमसंग (Samsung) यांसारख्या टॉप ब्रँड्सचे हेडफोन आणि इअरबड्स खरेदी करण्याची संधी आहे. अॅमेझॉनच्या हेडसेट डेजमध्ये कमी किमतीत उपलब्ध असलेले हेडफोन्स वनप्लस बड्स प्रो (Oneplus Buds Pro) - अॅमेझॉनवर सुरू असलेल्या हेडसेट डेजमध्ये वनप्लस बड्स प्रो 9990 रुपयांना मिळत आहेत. वनप्लस बड्सच्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं, तर यात वनप्लस ऑडिओ आयडी (OnePlus Audio ID), स्मार्ट अॅडाप्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (Smart Adaptive Noise Cancellation) आणि 38 तासांचं बॅटरी लाइफ देण्यात आलं आहे. इतकंच नाही, तर IP55 रेटिंगसह मिळत असलेले हे इयरबड्स डस्ट, वॉटर आणि स्वेट ब्लॉकर आहेत. हे वाचा- Cryptocurrency संदर्भात मोठी अपडेट, वाचा काय होणार भारतीय गुंतवणुकदारांवर परिणाम जबरा अलाइट अॅक्टिव्ह 75टी (Jabra elite active 75t) - अॅमेझॉनवर सुरू असलेल्या डीलअंतर्गत, जबरा अलाइट अॅक्टिव्ह 75टी (Jabra Alite Active 75t) हेडसेट फक्त 7999 रुपयांना उपलब्ध आहेत. अतिशय विश्वासार्ह असलेला हा हेडसेट अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन फीचरमुळे अधिक प्रभावी वाटतो. या हेडसेटमध्ये तुम्हाला IP57 रेटिंग मिळेल. सॅमसंग गॅलेक्सी बड्स प्रो (Samsung Galaxy Buds Pro) - या सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी बड्स प्रो फक्त 9990 रुपयांना खरेदी करण्याची संधी आहे. त्यातल्या इंटेलिजंट अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) फीचरमुळे हे वायरलेस इअरबड्स अधिक विश्वासार्ह वाटतात. यामध्ये तुम्हाला अशी सुविधा मिळते, की ज्याच्या मदतीने तुम्ही नॉइज कॅन्सलेशन आणि अॅडजस्टेबल अॅम्बियंट साउंडमध्ये स्विच करू शकता. सॅमसंग गॅलेक्सी बड्स प्रोमध्ये, तुम्हाला संतुलित आवाजासाठी AKG साउंड असलेले दोन साइड स्पीकरदेखील मिळतात. हे वाचा- Elon Musk यांनी विकले Teslaचे 9 अब्ज डॉलर्सचे शेअर्स,ट्विटर पोलवरुन घेतला निर्णय **रिअलमी बड्स वायरलेस 2 निओ (Realmy Buds Wireless 2 Neo) -**रिअलमी बड्स वायरलेस 2 निओ हा ब्लूटूथ नेकबँड सध्या अॅमेझॉनवर 1499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या नेकबँडमध्ये USB टाइप-सी फास्ट चार्जिंग सुविधा आहे. IPX4 वॉटर रेझिस्टंट असलेल्या या नेकबँडमध्ये मल्टी-डिव्हाइस स्विचिंग आणि एनव्हायर्न्मेंट नॉइज कॅन्सलेशन फीचर्स आहेत. तुम्हालाही कमी किमतीमध्ये ब्रँडेड हेडफोन्स, इयरबड्स खरेदी करायचे असतील, तर अॅमेझॉनवर सुरू असलेल्या हेडसेट डेजचा नक्की लाभ घ्या.h