युवराज सिंहने दिली रिषभ पंतच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट
मुंबई, 17 मार्च : भारताचा स्टार युवा क्रिकेटर रिषभ पंत सध्या दुखापतग्रस्त आहे. 30 डिसेंबर रोजी त्याच्या कारला भीषण अपघात झाला होता, यात रिषभ देखील गंभीर जखमी झाला. आता रिषभच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा होत असून भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंह याने रिषभ पंतची भेट घेतली आहे. युवराज सिंहने रिषभची भेट घेऊन त्याच्या सोबतच फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. काही वर्षांपूर्वी युवराज सिंहला देखील कॅन्सर हा जीवघेणा आजार झाला होता. परंतु युवराज यामधून सुखरूप बाहेर पडला आणि त्याने पुन्हा क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केले होते. युवराज सिंहने रिषभ सोबतच फोटो शेअर करत लिहिले, “हा चॅम्पियन पुन्हा उठणार आहे, सकारात्मकता आणि मजेदार माणूस. देव तुला अधिक शक्ती देवो”. या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहे.
विराट किंवा धोनी नाही तर हा खेळाडू आहे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर रिषभ पंतवर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याच्या पायावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून आता रिषभच्या प्रकृतीत सुधारणा होत आहेत. रिषभने काही दिवसांपूर्वी त्याच्या पूल मध्ये चालत थेरपी घेत असल्याचा व्हिडिओ देखील शेअर केला होता. या दुखापतीमुळे रिषभ पुढील सहा महिने क्रिकेटच्या ,मैदानापासून दूर राहणार आहे. रिषभ लवकरात लवकर बारा होऊन मैदानात परतावा अशी प्रार्थना त्याचे चाहते करीत आहेत.