JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / वानखेडे स्टेडियम बाहेरच विकली पाणीपुरी, आतून पाहण्याचं होतं स्वप्न, तिथेच झळकावलं शतक

वानखेडे स्टेडियम बाहेरच विकली पाणीपुरी, आतून पाहण्याचं होतं स्वप्न, तिथेच झळकावलं शतक

आझाद मैदानाजवळ पत्र्याच्या घरात राहताना वानखेडे स्टेडियममधून लाइटचा प्रकाश दिसायचा. तो पाहून एकदा तरी वानखेडे स्टेडियम आतून पाहण्याचं स्वप्न होतं अशा भावना यशस्वी जयस्वालने शतकानंतर व्यक्त केल्या.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 01 मे : यशस्वी जयस्वालने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात शेवटपर्यंत फलंदाजी केली. राजस्थान रॉयल्सला जरी सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी यशस्वी जयस्वालच्या शतकी खेळीची जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर त्याने झंझावाती शतक केलं. २०० च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना त्याने ६२ चेंडूत १२४ धावा केल्या. मुंबईच्या सर्व गोलंदाजांचा त्याने समाचार घेतला. वानखेडे स्टेडियमवर शतक करणारा यशस्वी जयस्वाल एकेकाळी वडिलांसोबत पाणीपुरी विकायचा. वानखेडे मैदानाबाहेर चाहत्यांचा मोठा आवाज यायचा तेव्हा बाहेर उभा असणारा यशस्वीला वाटायचं की एकदा तरी आत जाऊन वानखेडे स्टेडियम बघायचंय. आज त्याने त्याच मैदानात शतक झळकावलं. सामन्यानंतर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. यशस्वी जयस्वालने कॅप्टनलासुद्धा टाकलं मागे, पाहा IPLमधले सर्वात कमी वयाचे शतकवीर कोण? यशस्वी जयस्वाल म्हणाला की, इथपर्यंत प्रवास केल्यानंतर खूप भावुक झालोय. मी आझाद मैदानात पत्र्याच्या घरात रहायचे. इथली लाइट तिथे दिसायची तेव्हा विचार करायचो की कधी आत जाण्याची संधी मिळेल का. स्टेडियममधून येणारा मोठा आवाज नेहमीच आकर्षित करायचा. आता मी पुढचा विचार करत आहे. स्वत:ला मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करतोय. सामन्यानंतर रुटीनमध्येही स्वत:ला शिस्तबद्ध ठेवण्याचा प्रयत्न करतो. सध्या माझं लक्ष खेळावर आहे आणि मला त्यावर काम करायचंय. आपल्या शतकाबद्दल बोलताना यशस्वी म्हणाला की, शतक झालं तेव्हा मला माहिती नव्हतं की चेंडू सीमारेषेपलिकडे गेलाय. जेव्हा तो गेला तेव्हा मी देवाचे आभार मानले. मी असं शतक करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. फक्त प्रक्रियेवर लक्ष केंद्रीत करायचं होतं आणि कष्टही. रिझल्ट आपोआपो आला. रोहित शर्माचा पुल शॉट फेवरेट आहे, माही मॅच फिनिशिर बनून मोठे फटके मारतो. तुझा फेवरेट शॉट कोणता असा प्रश्न यशस्वीला विचारण्यात आला. त्यावर यशस्वीने म्हटलं की, मला स्टेट ड्राइव्ह आणि कव्हर ड्राइव्ह मारायला आवडतं. मला यातून आत्मविश्वास मिळतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या