JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WTC Finalमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या जर्सीत, Adidasला BCCI देणार इतके कोटी

WTC Finalमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या जर्सीत, Adidasला BCCI देणार इतके कोटी

World Test Championship Final New Jersy : ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना भारतीय संघ नव्या जर्सीत दिसणार आहे. बीसीसीआयने फक्त कसोटीच नव्हे तर वनडे आणि टी20साठीही नवी जर्सी लाँच केलीय.

जाहिरात

WTC फायनलआधी टीम इंडियाची नवी जर्सी

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 जून : आयपीएलनंतर आता भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडच्या ओव्हल मैदानात रंगणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघाने जोरदार तयारी सुरू केलीय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना भारतीय संघ नव्या जर्सीत दिसणार आहे. बीसीसीआयने फक्त कसोटीच नव्हे तर वनडे आणि टी20साठीही नवी जर्सी लाँच केलीय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 ते 11 जून पर्यंत ओव्हल स्टेडियमवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. या कसोटीसाठी भारतीय संघ आधीच जाहीर झाला आहे. आता भारतीय संघ तीन फॉरमॅटमध्ये नवी जर्सी घालून मैदानात उतरले. जुन्या जर्सीपेक्षा पूर्ण वेगळी अशी नवी जर्सी आहे. भारतीय क्रिकेट संघ आणि Adidasच्या सोशल मीडिया हँडलवर याचे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. WTC Final पावसाने धुतली जाणार? भारत-ऑस्ट्रेलिया कुणाला मिळणार ट्रॉफी? कसोटी रंगाची जर्सी पांढऱ्या रंगाची असून त्यावर निळ्या रंगात भारताचे नावही लिहिण्यात आले आहे. याशिवाय खांद्यावर दोन्ही बाजूला निळ्या रंगाच्या तीन पट्ट्या आहेत. छातीवर एका बाजूला Adidasचा तर दुसऱ्या बाजूला BCCIचा लोगो आहे. वनडे आणि टी20 साठी निळ्या रंगाच्या जर्सी आहेत. एक गडद निळा रंग तर दुसरा फिकट निळा रंग आहे. यात कोणतही टी२०साठी आणि कोणती वनडेसाठी हे अद्याप सांगण्यात आलेलं नाही. Adidamने 2028 पर्यंत भारतीय क्रिकेट संघाची क्रिकेट स्पॉन्सर असणार आहे. यासाठी Adidasला प्रत्येक सामन्यासाठी bcciला 75 लाख रुपये द्यावे लागतील. भारताच्या पुरुष, महिला आणि अंडर19 संघाच्या जर्सी Adidas तयार करणार आहे. याशिवाय टोपी आणि इतर वस्तुही Adidas तयार करणार आहे. यासाठी Adidas दरवर्षी बीसीसीआयला 10 कोटी रुपये देणार आहे. भारतीय क्रिकेट संघ नवी जर्सी घालून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या