JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WTC Final : कांगारुंची फजिती, भारत ऑलआऊट होण्याआधीच सोडलं होतं मैदान; पाहा काय घडलं

WTC Final : कांगारुंची फजिती, भारत ऑलआऊट होण्याआधीच सोडलं होतं मैदान; पाहा काय घडलं

तिसऱ्या दिवशी भारताचा डाव संपण्याआधीच ऑस्ट्रेलियन खेळाडुंनी मैदान सोडल्याचा प्रकार घडला होता. काही सेकंदांनी पुन्हा त्यांना मैदानावर यावं लागलं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 10 जून : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ओव्हलवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरू आहे. तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 4 बाद 123 धावा केल्या आहेत. यासह त्यांनी 296 धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय संघाचा डाव 296 धावात आटोपला. दरम्यान, तिसऱ्या दिवशी भारताचा डाव संपण्याआधीच ऑस्ट्रेलियन खेळाडुंनी मैदान सोडल्याचा प्रकार घडला होता. काही सेकंदांनी पुन्हा त्यांना मैदानावर यावं लागलं. याचा व्हिडीओ व्हायरल होत असून सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडुंची यामुळे खिल्ली उडवली जात आहे. भारताच्या पहिल्या डावाच्या 68 व्या षटकात हा प्रकार घडला. कॅमेरून ग्रीनने मोहम्मद सिराजविरुद्ध पायचीतचं अपील केलं. पंचांनीही त्याला पायचीत बाद दिलं. पण सिराजने यावर डीआरएस घेतला. दुसऱ्या बाजूला भारताच्या पहिल्या डावातली ही अखेरची विकेट होती. मैदानी पंचांनी सिराजला बाद देताच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मैदानाबाहेर जायला सुरुवात केली. तर इकडे सिराजने डीआरएस घेऊन निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेला. तिसऱ्या पंचांनी सिराजला नाबाद ठरवंल आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना पुन्हा मैदानात परतावं लागलं.

संबंधित बातम्या

WTC Final : ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत, दुसऱ्या फायनलमध्येही टीम इंडियाला हुलकावणी?   सिराजला पायचीत दिल्यानंतर त्याने डीआरएस घेतला. यामध्ये चेंडू त्याच्या पॅडवर लागण्याआधी बॅटला लागल्याचं दिसून आलं. यामुळे सिराजला जीवदान मिळालं. दरम्यान, डीआरएस न पाहताच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केलेल्या या कृतीवर टीका केली जातेय. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने कसोटीवर पकड मजबूत केलीय. भारताकडून अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांनी अर्धशतके केल्याने डाव सावरला. अजिंक्य रहाणेने 89 तर शार्दुलने 51 धावा केल्या. दोघांनी सहाव्या गड्यासाठी महत्त्वाची अशी शतकी भागिदारी केली. रहाणे बाद झाल्यानंतर भारताचा डाव गडगडला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या