मुंबई, 21 ऑगस्ट : ऑलिम्पिक मेडल विजेते (Tokyo Olympics 2020) कुस्तीपटू रवी दहिया, बजरंग पूनिया यांच्यासह आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियानं (WFI) कुस्तीपटूंसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कोणत्या खेळाडूनं खासगी संस्थांची मदत घेतली तर त्याला कोणत्याही स्पर्धेत खेळण्याची संधी दिली जाणार नाही, असा इशारा फेडरेशनचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी दिला आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारतानं कुस्तीमध्ये एक सिल्व्हर आणि 2 ब्रॉन्झ मेडल जिंकले आहेत. 2008 साली बीजिंगमध्ये झालेल्या स्पर्धेपासून प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये भारताला मेडल जिंकून देणारा कुस्ती हा एकमेव खेळ आहे. रेसलिंग फेडरेशननं यापूर्वीच विनेश फोगाटसह तीन खेळाडूंना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या विषयावर ‘इंडियन एक्स्प्रेस’ शी बोलताना सांगितले की, आम्ही खेळाडूंचे हे प्रकरण शिस्तपालन समितीकडं सोपवलं आहे. आता ही समिती विनेश फोगाट, सोनम मलिक आणि दिव्या काकरान यांची चौकशी करणार आहे. मी चूक केली हे सांगणं सोपं आहे. पण, ही चूक तुम्ही का केली? याचं कारण काय आहे? हे समजणे आवश्यक आहे.’ असे सिंह यावेळी म्हणाले. फेडरेशनला कल्पना नाही क्रीडा मंत्रालयाकडून टॉप पोडियम स्कीम (TOPS) अंतर्गत खेळाडूंना ट्रेनिंगसाठी विदेशात पाठवले जाते. याची आम्हाला कल्पना नसते. त्यामुळे अडचणी निर्माण होता. फेडरेशनला याची कल्पना हवी. विनेश फोगाटनं विदेशामध्ये ट्रेनिंग घेण्यासाठी आम्हाला कधीही संपर्क केला नाही. खेळाडूंनी विदेशात ट्रेनिंगची मागणी केली असती, तर आम्ही सर्वांना पाठवले असते. याबाबत आम्हाला संपर्क करण्यात आला नाही.’ असा दावा सिंह यांनी केला. गोल्ड मेडल विजेत्याचा सन्मान, पुण्यातील आर्मी स्टेडियमला नीरज चोप्राचं नाव! तीन खेळाडूंचे करिअर बरबाद ओजीक्यू आणि जेएसडबल्यू यासारख्या खासगी भागिदारांची आम्हाला गरज नाही, त्यांनी ती पहेलवानांचे करिअर बरबाद केले आहे, असा दावा सिंह यांनी केला. या खेळाडूंची नावं सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. ‘भारत सरकार खेळाडूंवर पैसा खर्च करण्यास तयार आहे. सरकारनं आत्तापर्यंत जवळपास 85 कोटी खर्च केले आहेत. खासगी संस्थांनी ज्यूनिअर पहेलवानांना मदत करावी. त्यांना मदतीची जास्त गरज आहे.’ असे सिंह यांनी स्पष्ट केले.