स्मृती मानधनाचा RCB संघ देणार दिल्लीला तगडी फाईट? आज महिला IPL चा दुसरा सामना
मुंबई, 5 मार्च : शनिवारी भारतात महिला प्रीमियर लीगचे बिगुल वाजले असून काल मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जाएंट्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात मुंबईने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली गुजरातचा तब्बल 148 धावांनी पराभव केला. पहिल्या सामना जिंकून मुंबईने विजयी सलामी दिली. आज रविवारी महिला IPL मधील सर्वाधिक चर्चेत असलेला रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हा संघ दिल्ली कॅपिटलशी भिडणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने कर्णधारपदाची धुरा स्टार क्रिकेटर स्मृती मानधना हिच्याकडे सोपवली आहे. स्मृतीला RCB संघाने 3.40 कोटी बोली लावत खरेदी केले होते. तर दिल्ली कॅपिटलचा संघ आज ऑस्ट्रेलियाची अनुभवी खेळाडू मेग लॅनिंग हिच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे . मेग लॅनिंग हिच्यावर 1.1 कोटी बोली लावून दिल्ली कॅपिटलने आपल्या संघात सामील करून घेतले होते. रॉयल चॅलेंजर्स आणि दिल्ली कॅपिटल या दोन्ही मजबूत संघांचा आज पहिला सामना आहे. तेव्हा दोन्ही संघ हा सामना जिंकून WPL मध्ये विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील. WPL 2023 : गुजरात जाएंट्सने फिट खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता? नक्की काय आहे प्रकरण कधी होणार सामना? रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल हा सामना आज मुंबईतील बेब्रॉन स्टेडियमवर होणार आहे. दुपारी 3:30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार असून त्यापूर्वी अर्धातास अगोदर दोन्ही संघांमध्ये नाणेफेक होईल.
कुठे पाहाल सामना? महिला प्रीमियर लीगचे सर्व सामने स्पोर्ट्स 18 चॅनेलवर दाखवण्यात येणार आहेत. तसेच याचे थेट प्रक्षेपण Jio Cinema वर प्रेक्षकांना पाहायला मिळेल.