JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WPL 2023 : सलग पाचवा सामना जिंकून मुंबई इंडियन्स ठरला प्ले ऑफमध्ये जाणारा पहिला संघ

WPL 2023 : सलग पाचवा सामना जिंकून मुंबई इंडियन्स ठरला प्ले ऑफमध्ये जाणारा पहिला संघ

मुंबईतील ब्रेबॉन स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जाएंट्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात मुंबईने गुजरात संघाचा पराभव केला. यासह मुंबई इंडियन्सचा संघ महिला आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरला आहे.

जाहिरात

सलग पाचवा सामना जिंकून मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये दिली धडक

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 मार्च : महिला प्रीमियर लीगमध्ये सलग पाचवा सामना जिंकून मुंबई इंडिअन्सच्या संघाने स्पर्धेत स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. आज मुंबईतील ब्रेबॉन स्टेडियमवर महिला आयपीएलचा 12 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जाएंट्स यांच्यात पारपडला. या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीत कमाल कामगिरी करून मुंबईने गुजरात विरुद्धचा सामना जिंकला. यासह मुंबई इंडिअन्सचा संघ महिला आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरला आहे. सामन्याच्या सुरुवातीला मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकात 8 विकेट्स गमावून 162 धावांपर्यंत मजल मारली. यात हरमनप्रीतची अर्धशतकीय खेळी सर्वात लक्षवेधी ठरली. मुंबईने विजयासाठी दिलेले आव्हान पार करताना गुजरात जाएंट्सची मोठी दमछाक झाली. मुंबईच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे गुजरातचे फलंदाज मैदानावर फार काळ तग धरून राहू शकले नाही. गुजरातच्या स्नेह राणा, सुषमा वर्मा, एस. मेघना आणि हरलीन देओल या चार खेळाडूंनाच दोन अंकी धावसंख्या करता आली.

संबंधित बातम्या

अखेर गुजरात संघाला 20 षटकात 9 विकेट्स गमावून 107 धावांपर्यंतहा मजल मारता आली आणि मुंबई संघाचा 55 धावांनी विजय झाला. यासह मुंबई इंडियन्सचा संघ प्ले ऑफमध्ये जाणारा पहिला संघ ठरला आहे. तर आता गुजरात संघाला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी यापुढचे सर्व सामने जिंकणं आवश्यक असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या