JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WPL 2023 : महागडे खेळाडू 'फ्लॉप', तर स्वस्तातले खेळाडू 'हिट'; WPL मध्ये मोठे उलटफेर!

WPL 2023 : महागडे खेळाडू 'फ्लॉप', तर स्वस्तातले खेळाडू 'हिट'; WPL मध्ये मोठे उलटफेर!

आयपीएलच्या धर्तीवर भारतात सुरु असलेली महिला प्रीमियर लीग स्पर्धेत आतापर्यंत महिला आयपीएलचे 10 सामने खेळवण्यात आलेत. परंतु या 10 सामन्यांचे विश्लेषण केले असता करोडो रुपयांची बोली लागलेले स्टार खेळाडू या स्पर्धेत फ्लॉप ठरत असून स्वस्त बोली लावण्यात आलेले खेळाडू हे हिट ठरत आहेत.

जाहिरात

महागडे खेळाडू 'फ्लॉप', तर स्वस्तातले खेळाडू 'हिट' WPL मध्ये मोठे उलटफेर!

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 मार्च : आयपीएलच्या धर्तीवर भारतात सुरु असलेली महिला प्रीमियर लीग स्पर्धा आता अतिशय रोमांचकारी होऊ लागली आहे. ही स्पर्धा सुरु होऊन आता एक आठवडा झाला असून आतापर्यंत महिला आयपीएलचे 10 सामने खेळवण्यात आलेत. परंतु या 10 सामन्यांचे विश्लेषण केले असता करोडो रुपयांची बोली लागलेले स्टार खेळाडू या स्पर्धेत फ्लॉप ठरत असून स्वस्त बोली लावण्यात आलेले खेळाडू हे हिट ठरत आहेत. महिला आयपीएलमधील 10 सामन्यांनंतर WPL 2023  च्या पॉईंट टेबलवर नजर टाकली असता यात मुंबई इंडिअन्सचा संघ आतापर्यंत खेळलेले चार ही सामने जिंकून प्रथम स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटलचा संघ 4 पैकी 3 सामने जिंकून दुसऱ्या स्थानी आहे. यूपी वॉरियर्सचा संघ 4 पैकी 2 सामने जिंकून तिसऱ्या स्थानी असून गुजरात जाएंट्सचा संघ 1 सामना जिंकून चौथ्या स्थानी आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ हा  4 ही सामन्यात पराभूत होऊन शेवटच्या स्थानी आहे. फ्लॉप ठरलेले महागडे खेळाडू : स्मृती मानधना : भारताची स्टार खेळाडू स्मृती मानधना हिला रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर संघाने 3. 40  कोटींना खरेदी केले तसेच तिच्याकडे संघाचे कर्णधारपद देखील सोपवण्यात आले.  परंतु स्मृती आतापर्यंत झालेल्या 4 सामन्यांमध्ये विशेष कामगिरी करू शकली नाही. तिच्या नेतृत्वात आरसीबी संघाने 4 सामने गमावले तसेच स्मृतीने या सामन्यांमध्ये एकूण 80 धावा केल्या.

दीप्ती शर्मा : स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिला यूपी वॉरिअर्सने 2.6 कोटी रुपयांना खरेदी केले. परंतु दीप्तीने 3 सामन्यांत केवळ 2 विकेट घेतल्या. रिचा घोष : स्टार यष्टीरक्षक आणि फलंदाज  रिचा घोष हिला आरसीबीने 1.9 कोटींना खरेदी केले. तिने 4 सामन्यांमध्ये 41 धावा, 2 स्टंपिंग आणि 1 कॅच घेतली. अँश्ले गार्डनर : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अँश्ले गार्डनर हिला गुजरात जाएंट्स संघाने 3.2 कोटींना खरेदी केले. तिने 3 सामन्यात 44 धाव करून 4 विकेट घेतल्या. ‘हिट’ ठरलेले स्वस्त खेळाडू : मेग लेनिन : ऑस्ट्रेलियन फलंदाज मेग लेनिन हिला दिल्लीने 1.1 कोटींना खरेदी केले. तिने 3 सामन्यांमध्ये 185 धावा केल्या. साइका इशाक : मुंबई इंडियन्सने साइका इशाक हिला 10 लाखांना खरेदी केले तिने 3 सामन्यांमध्ये 9 विकेट्स घेतल्या. एस भाटिया : यस्तिका भाटिया हिला मुंबई संघाने  1.5  कोटींना खरेदी केले. तिने 3 सामन्यात 65 धावा करून 1 कॅच आणि 2 स्टंपिंग केल्या. हेली मॅथ्युज : हेली मॅथ्युज हिला मुंबई संघाने 10 लाख रुपयांना खरेदी केले. तिने 3 सामन्यांत 156 धावा करून 6 विकेट्स घेतल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या