JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WPL 2023 : मुंबई इंडियन्स पाठोपाठ दिल्लीनेही मिळवलं प्ले ऑफमध्ये स्थान

WPL 2023 : मुंबई इंडियन्स पाठोपाठ दिल्लीनेही मिळवलं प्ले ऑफमध्ये स्थान

महिला आयपीएलच्या पहिल्या वाहिल्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यासाठी संघांना प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणे गरजेचे आहे. तेव्हा आता मुंबई पाठोपाठ दिल्लीच्या संघाने स्पर्धेच्या प्ले ऑफमध्ये धडक दिली आहे.

जाहिरात

मुंबई इंडियन्स पाठोपाठ दिल्लीनेही मिळवलं प्ले ऑफमध्ये स्थान

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई , 19 मार्च : सध्या भारतात महिला प्रीमियर लीग सुरु असून यात दररोज रोमांचक सामने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. महिला आयपीएल आता स्पर्धेच्या शेवटाकडे वाटचाल करीत असून 26 मार्च रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार. महिला आयपीएलच्या पहिल्या वाहिल्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यासाठी संघांना प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणे गरजेचे आहे. तेव्हा आता मुंबई पाठोपाठ दिल्लीच्या संघाने स्पर्धेच्या प्ले ऑफमध्ये धडक दिली आहे. महिला आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ 6  पैकी 5 सामने जिंकून पहिल्या स्थानावर आहे. यासह स्पर्धेत 10 पॉईंट्स मिळवून मुंबईचा संघ महिला आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणारा पहिला संघ ठरला. त्यानंतर आज 8 पॉईंट्सची आघाडी घेऊन दिल्ली कॅपिटल्सचा संघ महिला आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये जाणारा दुसरा संघ ठरला आहे.

संबंधित बातम्या

शनिवारी आरसीबी संघाने ब्रेबॉन स्टेडियमवर गुजरात जाएंट्स विरुद्ध सामना जिंकला. यानंतर सात पैकी पाच सामन्यात पराभूत होऊन गुजरातचा संघ नेट रन रेट नुसार महिला आयपीएलच्या पॉईंट टेबलवर शेवटच्या स्थानी पोहोचला. यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाने प्ले ऑफमध्ये धडक दिली. आता प्ले ऑफ मध्ये केवळ एका संघाचे स्थान शिल्लक असून हे स्थान पटकावण्यासाठी यूपी वॉरिअर्स आणि आरसीबी संघात चुरस रंगली आहे. तेवहा उर्वरित संघांमध्ये कोणता संघ प्ले ऑफमध्ये स्थान मिळवतो हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या