JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Womens T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेच्या पोरींनी सर्वांना चुकीचं ठरवलं! प्रथमच केला असा करिष्मा

Womens T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेच्या पोरींनी सर्वांना चुकीचं ठरवलं! प्रथमच केला असा करिष्मा

दक्षिण आफ्रिका संघ फायनलमध्ये पोहिचला असून त्यांचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत तब्बल 5 वेळा महिला वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली असून त्यांना हरवणं दक्षिण आफ्रिकेसाठी मोठे आव्हान असेल.

जाहिरात

दक्षिण आफ्रिकेच्या पोरींनी सर्वांना चुकीचं ठरवलं! प्रथमच केला असा करिष्मा

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 फेब्रुवारी : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या  महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये शुक्रवारी सेमी फायनलचा दुसरा सामना पारपडला. या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिका संघाने इंग्लंडवर सहा धावांनी विजय मिळवला. यासह दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने प्रथमच महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक दिली आहे. काल झालेल्या सेमी फायनलच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट घालवून 164 अशी धावसंख्या केली. यानंतर त्यांनी इंग्लंडला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले. दोन्ही संघांमध्ये विजयासाठी अतिशय अतितटीचा सामना पारपडला.  इंग्लंडच्या संघाला 18 चेंडूंत 28 धावांची आवश्यकता असताना दक्षिण आफ्रिकेची गोलंदाज अयाबोंगा खाकाने तीन धावांच्या देऊन तीन विकेट्स घेऊन सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने वळवला. विराट कोहलीला प्रपोज करणारी क्रिकेटर नेटकऱ्यांवर भडकली; सांगितलं तीच सत्य इंग्लंडचा संघ गडगडला आणि त्यांना 20 षटकात 8 विकेट्स गमावून केवळ 158 धावाच करता आल्या.  दक्षिण आफ्रिकेचा संघ सेमी फायनल सामन्यात इंग्लडला हरवू शकतील अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. परंतु दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने हे करून दाखवलं आणि थेट फायनलमध्ये प्रवेश मिळवला. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज ब्रिट्स आणि वोल्व्हार्ड यांनी संघासाठी 96 धावांची भागीदारी केली. ब्रिट्सने 68 धावा करत 6 चौकार आणि २ षटकार ठोकले, तर तर वोल्व्हार्डने 53 धावा केल्या.  परंतु इंग्लडच्या फिरकीपटूने आफ्रिकेच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवले. त्यानंतर मॅरीझान कॅपने 13 चेंडूंत नाबाद 27 धावा करून आफ्रिकेची धाव संख्या 160 च्या पार पोहिचवली. Prithvi Shaw Case : तुरुंगातून बाहेर येताच सपना गिलने दाखवला ग्लॅमरस अंदाज आता दक्षिण आफ्रिका संघ फायनलमध्ये पोहिचला असून त्यांचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत तब्बल 5 वेळा महिला वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली असून त्यांना हरवणं दक्षिण आफ्रिकेसाठी मोठे आव्हान असेल. रविवारी महिला टी 20 वर्ल्ड कपचा फायनल सामना होणार असून सायंकाळी 6:30 वाजता याला सुरुवात होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या