JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / बृजभूषण सिंह यांच्या अडचणी वाढणार, 4 कुस्तीपट्टूंनी पोलिसांना दिले पुरावे

बृजभूषण सिंह यांच्या अडचणी वाढणार, 4 कुस्तीपट्टूंनी पोलिसांना दिले पुरावे

महिला कुस्तीपट्टूंनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत बृजभूषण हे काहीतरी निमित्त काढून चुकीच्या हेतूने स्पर्श करायचे असा आरोप केला होता.

जाहिरात

बृजभूषणविरोधात कुस्तीपट्टूंनी पोलिसांना दिले पुरावे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 14 जून : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शऱण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपट्टूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या आऱोपांची चौकशी सध्या सुरू आहे. दरम्यान, काही कुस्तीपट्टूंनी पुरावे म्हणून दिल्ली पोलिसांकडे ऑडिओ आणि व्हिडीओ दिले आहेत. पोलिसांना या प्रकरणी 15 जूनच्या आधी आरोपपत्र दाखल करायचं आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोप करणाऱ्या 6 महिला कुस्तीपटूंपैकी चार कुस्तीपट्टूंनी पोलिसांना पुरावे दिले आहेत. यामहिला कुस्तीपट्टूंनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत बृजभूषण हे काहीतरी निमित्त काढून चुकीच्या हेतूने स्पर्श करायचे असा आरोप केला होता. यानंतर पोलिसांनी आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करण्यास सांगितलं होतं. रविवारी या महिलांनी पोलिसांना पुरावे दिले. न्यूझीलंडला मोठा धक्का! केन विल्यम्सननंतर आता अष्टपैलू क्रिकेटर वर्ल्ड कपमधून बाहेर   पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत जवळपास 200 लोकांच्या साक्षी नोंदवल्या आहेत. यामध्ये तक्रारदार कुस्तीपट्टू, प्रशिक्षक, रेफ्री, बृजभूषण सिंह यांच्या सहकाऱ्यांचाही समावेश आहे. बृजभूषण यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी 5 देशांच्या कुस्ती महासंघांकडे मदत मागितली होती. दिल्ली पोलिसांनी या पाचही देशांच्या महासंघांना पत्र पाठवून व्हिडीओ आणि फोटो इत्यादी माहिती मागितली होती. महिला कुस्तीपट्टूंनी बृजभूषण यांच्यावर इंडोनेशिया, बुल्गारिया, कझाकिस्तान, मंगोलिया आणि किर्गिस्तानमध्ये आय़ोजित स्पर्धेवेळी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. दिल्ली पोलिसांनी या देशांच्या कुस्ती महासंघांना पत्र लिहून स्पर्धेचे व्हिडीओ फूटेज आणि कुस्तीपट्टूंच्या राहण्याच्या ठिकाणचे व्हिडीओ देण्यास सांगितलं आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या देशांकडून मागवण्यात आलेले व्हिडीओ आणि इतर माहिती 15 जूनपर्यंत मिळणं कठीण आहे. तोपर्यंत दिल्ली पोलीस या प्रकरणी आपला अहवाल दाखल करेल. जेव्हा परदेशातून फोटो, व्हिडीओ मिळतील तेव्हा पुरवणी आरोपपत्र दाखल करू शकतो असंही दिल्ली पोलिसांनी म्हटलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या