JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Women IPL : Aye Aye Captains! टीम इंडियाचे दोन्ही कर्णधार मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात

Women IPL : Aye Aye Captains! टीम इंडियाचे दोन्ही कर्णधार मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात

महिलांच्या आयपीएलसाठी आज 13 फेब्रुवारी रोजी मुंबईत लिलाव प्रक्रिया पारपडत असून यात स्टार खेळाडूंना आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी आयपीएल फ्रेंचायजींमध्ये चुरस पाहायला मिळाली. यात मुंबई इंडियन्सने भारताच्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला खरेदी केले आहे.

जाहिरात

टीम इंडियाचे दोन्ही कर्णधार मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 फेब्रुवारी :  बीसीसीआयतर्फे मार्च 2023 मध्ये प्रथमच महिला प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात येणार आहे. महिलांच्या आयपीएलसाठी आज 13 फेब्रुवारी रोजी मुंबईत लिलाव प्रक्रिया पारपडत असून यात स्टार खेळाडूंना आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी आयपीएल फ्रेंचायजींमध्ये चुरस पाहायला मिळाली. यात आयपीएल फ्रेंचायजी असलेल्या मुंबई इंडियन्सने भारताच्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला खरेदी केले आहे. पहिल्यांदा होत असलेल्या आयपीएल लिलावात खरेदी होणारी खेळाडू हरमनप्रीत कौर होती. हरमनप्रीतला घेण्यासाठी आयपीएलच्या प्रत्येक फ्रेंचायजीने प्रयत्न केले. परंतु अखेर हरमनप्रीतसाठी सर्वाधिक 1.80 कोटींची बोली लावून मुंबई इंडियन्सने तिला महिला प्रीमियर लीगसाठी खरेदी केले. हरमनप्रीतला आपल्या ताफ्यात सामील करून घेतल्यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या गोटात महिला आणि पुरुष अशा दोन भारतीय कर्णधारांचा समावेश आहे.

भारतीय पुरुष संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा देखील 2011 पासून मुंबई  इंडियन्स सोबत खेळत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ  इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सर्वात यशस्वी राहिला आहे. रोहितच्या कॅप्टनसीखाली मुंबई इंडियन्सने तब्बल 5 वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरले. त्यामुळे आता भारतीय संघाच्या महिला कर्णधार हरमनप्रीत कौरकडे मुंबई इंडियन्सने नेतृत्व सोपवल्यावर ती महिला प्रीमियर लीगमध्ये कशी कामगिरी करून दाखवते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या

मुंबई इंडियन्स संघाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. यात भारतीय पुरुष संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय महिला  संघाची कॅप्टन हरमनप्रीत कौर हीचा समावेश आहे. या फोटोला त्यांनी “Leaders. Legends. Playing for Mumbai indians” असं कॅप्शन लिहिलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या