WPL च्या ऑक्शनवर फिदा झाला दिनेश कार्तिक
मुंबई, 14 जानेवारी : काल 13 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे महिला प्रीमिअर लीगचा लिलावात पारपडला. या लिलावात महिला क्रिकेटर्सना आपल्या संघांमध्ये घेण्यासाठी संघांनी त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांची बोली लावली. यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने लिलावात सर्वाधिक बोली लावून स्मृती मानधना हिला खरेदी केले. या ऑक्शनमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे ऑक्शन मल्लिका सागर हिने. मल्लिकाने महिला प्रीमियर लीगच्या ऑक्शनमध्ये आपले काम चोख बजावले. मल्लिकाचा हाच अंदाज भारताचा अनुभवी क्रिकेटर दिनेश कार्तिकला देखील भावला.
क्रिकेटर दिनेश कार्तिक हा सुरुवातीपासूनच महिला प्रीमिअर लीगसाठी उत्साही होता. त्याने लिलावापूर्वी देखील अनेक ट्विट करत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. दरम्यान ऑक्शन सुरु असतानाच दिनेश कार्तिक याने ट्विट करत ऑक्शनर मल्लिका सागर हिचे कौतुक केले. त्याने लिहिले, “मल्लिका सागर एक उत्कृष्ट लिलावकर्ती आहे. आत्मविश्वासू , स्पष्ट आणि अतिशय शांत. WPL साठी अतिशय योग्य निवड”.
बीसीसीआयने महिला प्रीमियर लीगसाठी मल्लिका सागरकडे ऑक्शनची जबाबदारी दिली होती. यापूर्वी मल्लिकाने प्रो कबड्डी लीगमधील खेळाडूंचा लिलाव केला आहे. मल्लिका या सेंटर फॉर मॉडर्न अँड कंटेम्पररी आर्ट, मुंबई येथे सल्लागार पदी आहे. तसेच ती आर्ट इंडिया कन्सल्टंट फर्ममध्येही भागीदार आहे.