wankhede stadium
दिल्ली, 21 फेब्रुवारी : भारतात महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आता महिला आय़पीएलची सुरूवात होणार आहे. महिला क्रिकेट पाहण्यासाठी प्रोत्साहन देताना भारत ऑस्ट्रेलिया महिला संघांच्या मालिकेवेळी मुंबईत महिलांना स्टेडियममध्ये मोफत प्रवेश देण्यात आला होता. दरम्यान, आता दिल्लीत अरुण जेटली स्टेडियमवर स्टेडियममध्ये भारत ऑस्ट्रेलिया कसोटी सामना बघायला गेलेल्या एका महिला चाहतीने स्टेडियममधील सुविधांबाबत तक्रार केली आहे. सोशल मीडियावर बीसीसीआय़ आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना टॅग करत शिल्पा फडके यांनी स्टेडियममध्ये असलेल्या सुविधांच्या कमतरतेबाबत तक्रार केलीय. शिल्पा फडके यांनी म्हटलं की, मुंबई, दिल्लीत स्टेडियममध्ये क्रिकेट पाहणं हे एका वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. एक तर इथे टॉयलेट सापडत नाही आणि जिथे असतं तिथे लाइट, पाणी नसतं. अशा स्थितीत महिला चाहत्यांनी काय करायचं? असा प्रश्न शिल्पा यांनी विचारला आहे. हेही वाचा : स्मृती मानधनाने अर्धशतक झळकावत केले अनेक विक्रम, एक नकोसा रेकॉर्डही नावावर जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयकडून देशभरात ५० हून जास्त आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये क्रिकेट सामने घेतले जातात. इथली क्रिकेट इंडस्ट्रीसुद्धा ८२ हजार कोटी रुपयांची आहे. अशा स्थितीत एका महिला चाहतीने उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे मैदान व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. वरिष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकपाली यांनीही महिला चाहतीने केलेल्या तक्रारीचं समर्थन केलंय. आशा आहे की बीसीसीआय या तक्रारीकडे लक्ष देईल आणि स्टेडियममध्ये परिस्थिती सुधारेल.
शिल्पा फडके यांनी ट्विटरवर म्हटलं की, मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर महिला टॉयलेट बंद होते आणि एक सुरू होतं त्यात लाइट, पाणी, डस्टबीन, टॉयलेट पेपरसुद्धा नव्हता. अस्वच्छतेमुळे मला माझ्या ८ वर्षांच्या मुलीला सांगावं लागलं की स्टेडियममधलं पाणी पिण्यायोग्य नाही. स्टेडियमच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला स्वच्छ पाणी पिता येईल. हेही वाचा : हरमनप्रीतने केला विश्वविक्रम, पुरूष आणि महिला क्रिकेटर्समध्ये अशी पहिलीच खेळाडू दिल्लीतील स्टेडियममधील वॉशरुम उघडे होते जिथे पाणीही नव्हतं. तिथे डस्टबिन, टॉयलेट पेपर नव्हते. फरशीवर घाण होती आणि दुर्गंधी पसरलेली होती. स्वच्छ आणि सुरक्षित वॉशरूम ठेवणं ही व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. आता या सगळ्यात कुणी घरीच टीव्हीवर सामने पाहा असं सांगू नका. महिला चाहत्यांना अशा परिस्थितीत सामने दाखवण्यासारखं काहीच लाजीरवाणं नाही अशा शब्दात महिलेनं संताप व्यक्त केलाय.