नवी दिल्ली, 31 जानेवारी : हरियाणा इथल्या 18 वर्षांच्या सोनम मलिकनं (Sonam Malik) कुस्तीत मोठा विजय मिळवला आहे. तिनं 2016 ऑलिम्पिकची चॅम्पियन ब्रॉन्झ मेडलिस्ट साक्षी मलिकला (Sakshi Malik) धोबीपछाड दिली आहे. सोनम मलिकनं नॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप (national wrestling championship) जिंकली आहे. तिनं साक्षी मालिकला 62 किलोच्या कॅटेगरीत 7-5 नं हरवलं आहे. या विजेतेपदासह तिच्या गळ्यात गोल्ड मेडल (gold medal) पडलं. सोनमनं साक्षीविरुद्ध मिळवलेला हा सलग तिसरा विजय आहे. सोनमनं 2020 मध्ये एशियन चॅम्पियनशिप आणि एशियन ऑलिम्पिक क्वालिफायरमध्ये साक्षीला पराभूत केलं होतं. विशेष म्हणजे, जो हात लकव्यानं दुखावला (injury) गेला होता त्याच हातानं सोनमनं साक्षीला हरवलं. सोनमकडे आता भारतीय रेसलिंगचा नवा उगवता तारा म्हणून पाहिलं जात आहे. राइट आर्म लॉकच्या माध्यमातून सोनमनं साक्षीला हरवलं. सोनमचा उजवा हात दोन वर्षांपूर्वी दुखावला होता. यामुळं तिचं करियर सुरू होतानाच संपतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. हे ही वाचा- IND vs ENG : इंग्लंडला वाटतेय टीम इंडियाच्या या खेळाडूची भीती सोनमने कोच सांगतात, की ती 6 महिने बेड रेस्ट करत होती. अगदी आपला हात उचलणंही तिला शक्य होत नसे. डॉक्टरांनी अतिशय दुःखी स्वरात कळवलं होतं, की सोनमनं आता रेसलिंगमध्ये करियर करण्याचं स्वप्न सोडून दिलं पाहिजे. मात्र सोनम आणि तिचे वडील राज यांनी हार मानली नाही. पैशांच्या अडचणीमुळे वडिलांनी तिचा आयुर्वेदिक पद्धतीनं इलाज केला. या इलाज खूप प्रभावी ठरला आणि सोनमनं आपल्या दुखण्यावर मात केली. यानंतर सोनम पुन्हा एकदा रेलसिंग रिंगमध्ये उतरली आणि तिनं थेट इतिहासच घडवला. 2019 मध्ये सोनमनं दुसऱ्यांदा वर्ल्ड कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड मेडल जिंकलं. याआधी 2017 मध्येही तिनं ही चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. हा सन्मान दोनदा जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. याआधी केवळ सुशील कुमार यांनी हा खिताब दोनदा जिंकलेला आहे.