पराभवानंतर जोकोविच झाला भावुक
लंडन, 17 जुलै : विम्बल्डनच्या पुरुष एकेरीत दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचला मोठा धक्का देत स्पेनच्या कार्लोस अल्कराजने विजेतेपद पटकावलं. यासह जोकोविचचं सलग पाचव्या विजेतेपदाचं स्वप्न भंगलं. विम्बल्डनमध्ये दबदबा असलेल्या जोकोविचला हरवून कार्लोस अल्कराजने इतिहास घडवला. विम्बल्डन फायनलमध्ये पराभवानंतर जोकोविचच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. फायनलनंतर बोलताना त्याने माजी कट्टर प्रतिस्पर्धी रॉजर फेडररचासुद्धा उल्लेख केला. सामन्यानंतर बोलताना जोकोविचने लहानमुलगा स्टिफनबद्दल सांगितलं. चार तास 42 मिनिटं चाललेल्या सामन्यावेळी स्टिफन बॉक्समध्ये होता. तो नाराज होऊन रडत होता. सामन्यानंतर बोलण्याआधी जोकोविचने मुलाला शांत करण्यासाठी म्हटलं की,“हो, माझ्या मुलाला अजुनही तिथं हसत पाहणं चांगलं वाटतं. मी तुझ्यावर प्रेम करतो. मला सपोर्ट करण्यासाठी धन्यवाद.” यावेळी जोकोविच भावुक झाला आणि त्याला अश्रू रोखता आले नाही. विम्बल्डनचा नवा सम्राट, स्पेनच्या कार्लोस अल्कराजला विम्बल्डनचं विजेतेपद पराभवाबाबत बोलताना जोकोविचने म्हटलं की, हे स्पष्ट आहे की अशा पद्धतीने मॅच गमावणं कधीच आवडणार नाही. पण सर्व भावना शांत होतील तेव्हा मला आभार मानावं लागेल. कारण भूतकाळात अनेक चुरशीचे आणि अतितटीचे सामने इथे मी जिंकले आहेत. काही नावे सांगायची तर 2019 मध्ये रॉजर विरुद्धच्या फायनलमध्ये मॅच पॉइंट मागे होतो. कदाचित मी ज्या फायनल जिंकलो त्यातल्या काही हरायला पाहिजे होतो. हीसुद्धा एक.
जोकोविच 35 व्यांदा ग्रँड स्लॅम फायनलमध्ये पोहोचला होता. जोकोविच आणि अल्काराज यांच्यात फ्रेंच ओपनमध्येही लढत झाली होती. तेव्हा अल्काराजला दुखापत असतानाही जोकोविचला जोरदार टक्कर दिली होती. तर जोकोविचने विम्बल्डनमध्ये 2013 साली फायनल गमावली होती. तर अल्काराज दुसऱ्यांदा ग्रँड स्लॅम फायनलमध्ये खेळला. त्याच्या कारकिर्दीतलं हे दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलं.