JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / क्रिकेट जगतातला सगळ्यात वादग्रस्त आऊट, पोलार्डने काय केलं, पाहा VIDEO

क्रिकेट जगतातला सगळ्यात वादग्रस्त आऊट, पोलार्डने काय केलं, पाहा VIDEO

वेस्ट इंडिजने तीन वनडे मॅचच्या पहिल्या वनडेमध्ये श्रीलंकेचा (West Indies vs Sri Lanka) 8 विकेटने पराभव केला. श्रीलंकेचा बॅट्समन दानुष्का गुणतिलकाला (Danushka Gunathilaka) आऊट करताना कायरन पोलार्डने (Kieron Pollard) जी पद्धत वापरली, त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 मार्च : वेस्ट इंडिजने तीन वनडे मॅचच्या पहिल्या वनडेमध्ये श्रीलंकेचा (West Indies vs Sri Lanka) 8 विकेटने पराभव केला. टॉस जिंकून पहिले बॅटिंगसाठी उतरलेल्या श्रीलंकेचा 49 ओव्हरमध्ये 232 रनवर ऑल आऊट झाला. या आव्हानाचा पाठलाग करताना शाय होपने (Shai Hope) 110 रनची खेळी केली. होपशिवाय एव्हिन लुईसनेही 65 रनची खेळी केली. पण या मॅचनंतर पोलार्डवर (Kieron Pollard) टीका होत आहे. श्रीलंकेचा बॅट्समन दानुष्का गुणतिलकाला (Danushka Gunathilaka) आऊट करताना पोलार्डने जी पद्धत वापरली, त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. श्रीलंकेने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. ओपनर दानुष्का गुणतिलकाने 55 रन आणि कर्णधार दिमुथ करुणारत्नेने 52 रन करून टीमला चांगली सुरूवात करून दिली. गुणतिलकाने 61 बॉलमध्ये 7 फोर, तर करुणारत्नेने एवढ्याच बॉलमध्ये 4 फोर मारले. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 105 रनची पार्टनरशीप केली.

संबंधित बातम्या

मॅचच्या 20व्या ओव्हरमध्ये पोलार्डने करुणारत्नेचा शानदार कॅच पकडला आणि ही जोडी फोडली. पण पोलार्डचा एक निर्णय आता वादात सापडला आहे. 22 व्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर गुणतिलकाने शॉट मारला. दुसऱ्या बाजूला उभ्या असलेला पाथुम निसंका रन काढण्यासाठी धावला. पण पोलार्डची चपळता बघून दोन्ही बॅट्समन क्रीजमध्ये परत आले. परत येताना गुणतिलकाचा पाय बॉलला लागला आणि बॉल मागे गेला. यावेळी पोलार्ड चिडला आणि त्याने लगेच अंपायरकडे तक्रार केली आणि आऊटसाठी अपील केलं. पोलार्डच्या अपीलनंतर अंपायर जोएल विलसन थर्ड अंपायरकडे गेले. रिप्ले बघितल्यानंतर गुणतिलकाला थर्ड अंपायरने आऊट दिलं. ऑबस्ट्रक्टिंग द फिल्ड केल्याचं सांगत गुणतिलकाला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या