JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ICC World Cup 2023 : क्रिकेट विश्वात मोठा उलटफेर, दोन वेळा चॅम्पियन ठरलेली टीम वर्ल्ड कपमधून बाहेर

ICC World Cup 2023 : क्रिकेट विश्वात मोठा उलटफेर, दोन वेळा चॅम्पियन ठरलेली टीम वर्ल्ड कपमधून बाहेर

क्वालिफाय फेरीत प्रतिस्पर्ध्यांकडून पराभवाची चव चाखल्यामुळे दोन वेळा चॅम्पियन ठरलेला वेस्ट इंडिज संघ यंदा वर्ल्ड कप स्पर्धेत खेळताना दिसणार नाही.

जाहिरात

क्रिकेट विश्वात मोठा उलटफेर, दोन वेळा चॅम्पियन ठरलेली टीम वर्ल्ड कपमधून बाहेर

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 जुलै : यंदा भारतात होणाऱ्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधून वेस्ट इंडिजचा संघ बाहेर पडला आहे. वर्ल्ड कप क्वालिफाय फेरीतील महत्वाच्या सामन्यात स्कॉटलंडने वेस्ट इंडिजचा पराभव केला केल्यामुळे 48 वर्षातून पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा संघ आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होणार नाही. क्वालिफाय फेरीत प्रतिस्पर्ध्यांकडून पराभवाची चव चाखल्यामुळे दोन वेळा चॅम्पियन ठरलेला वेस्ट इंडिज संघ यंदा वर्ल्ड कप स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. वर्ल्ड कप क्वालिफाय फेरीत खेळवण्यात आलेल्या सामन्यात स्कॉटलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी वेस्ट इंडिजचा संघ फलंदाजी करताना 43.5 ओव्हरमध्ये केवळ 180 धावाच करू शकला. यावेळी जेसन होल्डरने 79 चेंडूंत 45 धावा केल्या, तर रोमारियो शेफर्ड 43 चेंडूत 36 धावा केल्या. तर स्कॉटलंडने वेस्ट इंडिजचे आव्हान 43.3 ओव्हरमध्येच पूर्ण केले. यावेळी स्कॉटलंडचा फलंदाज मॅथ्यू क्रॉसने 74 धावा केल्या तर  ब्रँडन मॅकमुलेनने देखील 69 धावांची कामगिरी केली.

वेस्ट इंडिजने 1975 आणि 1979 साली आयसीसी वर्ल्ड कपवर नाव कोरले होते. क्रिकेटच्या मैदानावर दमदार कामगिरी करणाऱ्या वेस्ट इंडिज सारख्या संघाला यंदा प्रथमच वनडे वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आहे. तसेच वेस्ट इंडिजचा संघ क्वालिफाय फेरीतून बाहेर पडकल्याने झिम्बाब्वे संघ भारतात होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या