Cheteshwar Pujara Holidays In Paris : भारतीय कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा सध्या पॅरिसमध्ये आपल्या कुटुंबासह सुट्टी घालवत आहे. काऊंटी क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीचं बक्षीस पुजाराला मिळालं आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या कसोटी संघात पुनरागमन करण्यात पुजाराला यश आलं आहे. ससेक्स कौंटी क्लबकडून खेळताना पुजाराने चार सामन्यांत दोन शतकं आणि दोन द्विशतकं झळकावली होती. कौंटी क्रिकेट संपल्यानंतर पुजारा पत्नी पूजा आणि मुलगी अदितीसोबत पॅरिसला पोहोचला आहे.
चेतेश्वर पुजाराने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पत्नी पूजा पाबरीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोच्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध आयफेल टॉवर दिसत आहे. दोघेही खूप खूश दिसत आहेत. (PIC-Instagram)
पुजाराने यापूर्वी पॅरिसमध्ये येतानाचा एक फोटो अपलोड केला होता (चेतेश्वर पुजारा हॉलिडेज इन पॅरिस), ज्यामध्ये तो टी-शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये मस्त दिसत होता. खराब फॉर्ममुळे चेतेश्वर पुजाराला काही काळापूर्वी कसोटी संघातून वगळण्यात आलं होतं. (PIC-Instagram)
34 वर्षीय उजव्या हाताने खेळणारा फलंदाज चेतेश्वर पुजारा याला श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेत खराब प्रदर्शन केल्याने बाहेर पडला होता. त्याला आयपीएल 2022 मेगा लिलावात कोणत्याही संघाने खरेदी केलं नाही. त्यानंतर तो काउंटी क्रिकेटकडे वळला. तिथे त्याची बॅट जोरात चालली. (PIC-Instagram)
काऊंटी क्रिकेटमध्ये ससेक्सकडून खेळताना चेतेश्वर पुजाराने 8 डावात 720 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने दोन शतके आणि दोन द्विशतके झळकावली. पुजाराची कौंटीतील उत्कृष्ट कामगिरी लक्षात घेता त्याचं कसोटी संघात पुनरागमन अपेक्षित होतं. (PIC-Instagram)
कौंटी क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजाराचा आठ डावांमध्ये स्कोअर 6, 201*, 109, 12, 203, 16, 170* आणि 3 होता. एप्रिल-मेमध्ये झालेल्या या सामन्यांमध्ये पुजाराची सरासरी 120 होती. (PIC-Instagram)
चेतेश्वर पुजाराने 95 कसोटी सामन्यांमध्ये 18 शतके आणि 32 अर्धशतकांसह 44 च्या सरासरीने 6713 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर, चेतेश्वर पुजाराने 231 सामन्यांच्या 382 डावांमध्ये 52 च्या सरासरीने एकूण 17668 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटने 54 शतके आणि 70 अर्धशतके झळकावली आहेत. (PIC-Instagram)
कसोटी संघात परतल्यानंतर पुजाराने सांगितलं की, तो सकारात्मक मानसिकतेने काउंटी क्रिकेट खेळायला गेला होता. मोठी खेळी खेळण्याच्या इराद्याने आपण इंग्लंडमध्ये आलो असल्याचं त्यानं सांगितलं. पुजारा म्हणाला की, मोठ्या खेळीचा अर्थ शतक नसून 150 पेक्षा जास्त धावा असा होतो. (PIC-Instagram)z
चेतेश्वर पुजारा म्हणाला की, मी काउंटीमध्ये माझा जुना फॉर्म परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तो म्हणतो की, तो 80 आणि 90 धावा करत होता. पण त्याला त्याला मोठ्या खेळीत रूपांतरित करता आल्या नाहीत. पण आता त्याने हरवलेला सूर परत मिळवला आहे. (PIC-Instagram)