पराभव होताच माजी क्रिकेटर संतापला; राग काढण्यासाठी केलं असं कृत्य Video Viral
मुंबई, 23 फेब्रुवारी : सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग ही क्रिकेट स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत काल मुलतान सुलतान आणि कराची किंग्स या संघांमध्ये सामना खेळवण्यात आला. परंतु मुलतान सुलतान संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना कराची किंग्स संघाला अवघ्या 3 धावांनी पराभव पत्करावा लागला. अशातच पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि कराची किंग्ज संघाचा अध्यक्ष वसीम अक्रम हा कराची किंग्स संघाच्या पराभवानंतर संतापला आणि त्याने रागात केलेल्या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बुधवारी झालेल्या पाकिस्तान सुपर लीगमधील मॅचमध्ये कराची किंग्स संघ आणि मुलतान सुलतान या संघांमध्ये अतितटीचा सामना पारपडला. या सामन्यात कराची किंग्सचा तीन धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर स्टेडियममध्ये बसलेल्या वसीम अक्रम चांगलाच संतापला. यावेळी त्याने सगळा राग त्याच्या समोरील सोफ्यावर काढला. त्याने रागात सोफ्यावर जोरदार लाथ मारली. Sania Mirza & Shoaib Malik Divorce : पाकिस्तानी अभिनेत्रीने शोएब मलिक सोबतच्या नात्याबाबत केला मोठा खुलासा
सध्या वसीम अक्रमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.