JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'आजारपणातही शांततेत खेळणे' विराटच्या शतकानंतर अनुष्का शर्माची पोस्ट चर्चेत

'आजारपणातही शांततेत खेळणे' विराटच्या शतकानंतर अनुष्का शर्माची पोस्ट चर्चेत

विराटच्या 75 व्या शतकानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच अनुष्का शर्माने इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवत विराटच्या तब्बेती विषयी मोठा खुलासा केला.

जाहिरात

'आजारपणातही शांततेत खेळणे' विराटच्या शतकानंतर अनुष्का शर्माची पोस्ट चर्चेत

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 मार्च : अहमदाबाद येथे सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात उभारलेला दिलेलं 480 धावांचा डोंगर पार करून 91 धावांची आघाडी घेतली. यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची झुंजार खेळी अतिशय महत्वाची ठरली. विराटने तब्बल 185 धावा करून शेवट पर्यंत ऑस्ट्रेलियाशी दोन हात केले. यादरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपले 75 वे शतक ठोकले. परंतु विराटच्या या शतकी खेळीनंतर त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माची पोस्ट फार चर्चेत आली आहे. विराटने आज कसोटी क्रिकेटमधील त्याचे 28 वे शतक ठोकले. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामन्यात हे त्याचे 8 वे शतक असून यासह त्याने भारतचे दिग्गज माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. विराटच्या 75 व्या शतकानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच अनुष्का शर्माने देखील तिचं इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवत विराटाचे कौतुक केले आणि विराटच्या तब्बेती विषयी मोठा खुलासा केला.

अनुष्काने विराटचा एक व्हिडीओ सोशल शेअर केला.  यावर तिने लिहिले, “अशा प्रकारे शांततेने आजारपणातही तुझे खेळणे. मला नेहमी प्रेरणा देते.” अनुष्काच्या या पोस्टनंतर विराट यासामन्या दरम्यान आजारी होता का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. परंतु असे असले तरी विराटने आज एका अनुभवी क्रिकेटर प्रमाणे आपल्या संघाला तारून नेले .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या