Team India
नवी दिल्ली, 19 डिसेंबर: टीम इंडिया सध्या साउथ अफ्रीका (India vs South Africa) दौऱ्यावर आहे. यादरम्यान, 3 टेस्ट आणि 3 वनडे सिरीज खेळवण्यात येणार आहे. मात्र, या सर्व सामन्यादरम्यान सर्वांची नजर टेस्ट क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) टेकली आहे. कारण, साउथ अफ्रीका दौऱ्यापूर्वी क्रिकेट जगतात अनेक घडमोडी घडल्या. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी (India tour of South Africa) टेस्ट टीमची निवड करण्याच्या दीड तास आधी मला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्याचं सांगण्यात आले असे विधान विराटने साउथ अफ्रीका दौऱ्यापूर्वी केले होते. त्यावरुन क्रिकेट जगतात सध्या Virat VS BCCI असा वाद रंगला आहे. अशातच, टीमने साउथ अफ्रीका दौऱ्यादरम्यान अभ्यास सत्र सुरू केले आहे. 26 डिसेंबरला सेंचुरियन येथे साउथ अफ्रीकाविरुद्ध पहिली टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, विराट कोहलीने आपल्य सहकारी खेळांडूसोबत पहिला फोटो शेअर केला. आणि पहिले सेशल पार पाडले अशी माहिती कॅप्शनमध्ये दिली.
विराटसोबल फोटोमध्ये, इशांत शर्मा,चेतेश्वर पुजारा, मोहम्मद सिराज, जयंत यादव, आर अश्विन (R Ashwin) आणि उमेश यादव दिसत आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. विराट कोहलीने (Virat Kohli vs Sourav Ganguly) टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडल्यानंतर त्याला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरूनही हटवण्यात आलं. विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं सांगण्यात आलं होतं, पण त्याने ऐकलं नाही. निवड समितीला मर्यादित ओव्हरच्या फॉरमॅटसाठी एकच कर्णधार हवा होता, त्यामुळे त्यांनी विराटला वनडे कॅप्टन्सीवरून हटवण्याचा निर्णय घेतला, असं बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला. गांगुलीचं हे वक्तव्य विराट कोहलीने खोडून काढले.